आदिवासी भागातील गरोदर महिला प्रसूती कडे जिल्हा उपरुग्णालय चोपडा येथे डॉक्टर्स कर्ता चे दुर्लक्ष मा. तहसीलदार चोपडा यांच्यामार्फत मा. जिल्ह...
आदिवासी भागातील गरोदर महिला प्रसूती कडे जिल्हा उपरुग्णालय चोपडा येथे डॉक्टर्स कर्ता चे दुर्लक्ष
मा. तहसीलदार चोपडा यांच्यामार्फत मा. जिल्हा अधिकारी जळगाव यांचा कडे चोपडा जिल्हाउप रुग्णालयाचे डॉक्टर प्रशासनावर चौकशी करून लवकरात लवकर कारवाई ची मागणी केलेली आहे
प्रतिनिधी चोपडा
( संपादक : हेमकांत गायकवाड )
सविस्तर वृत्त असे की कर्जाने ता चोपडा जिल्हा जळगांव येथील आदिवासी सातपुडा भागात गावे असून या भागात काल एक गरीब महिला प्रसूती वेळी आदिवासी सामाजिक कार्यकर्ता प्रमोद बारेला यांनी चोपडा येथे जिल्हा उप रुग्णालय येथे दाखल केले असता, ती महिला तेथील डॉक्टर्स कर्मचारी यांच्या हलगर्जीपणा व दुर्लक्षा मुळे महिला सिरीयस झाली त्यामुळे नाईलाजाने खाजगी रुग्णालयात दाखल करून सामान्य प्रसूती झाली. आणि कुटुंबाला मोठ्या प्रमाणावर आर्थिक पैशाच्या समस्येला सामोरं जाव लागल
तर मागील तीन महिन्यापासून कर्जाने गावाचे असेच चार ते पाच महिलांना प्रसूतीसाठी रुग्ण चोपडा येथे ऍडमिट केले असता काहीही उपचार न करता रुग्णाच्या नातेवाईकांना सरळ सरळ सिरीयसची भीती दाखवून रुग्णांना जिल्हा रुग्णालय जळगाव येथे रेफर करून टाकतात.
तसेच रुग्णाच्या नातेवाईकांना नाइलाजाने ते रुग्ण खाजगी रुग्णालयात ऍडमिट करावे लागते आणि त्याठिकाणी सामान्य प्रसूती होते. व त्यावेळी आदिवासी महिलांची आर्थिक पिळवणूक होते. कित्येक आदिवासी भागातील महिलांना या निष्काळजीपणा करत डॉक्टर शासनाच्या सोई-सुविधा पासून वंचित ठेवत आहे.आणि खाजगी रुग्णालयात आर्थिक बळी पडतात
त्याचप्रमाणे आदिवासी भागतील सर्व महिलांना सामान्य प्रसूती या रुग्णालयात डॉक्टर्स कर्मचारी करीत नाही.नेहमी काही ना काही कारणं किंवा भीती दाखवून ते जळगांव रुग्णालयात पाठवतात.तसेच गरीबआदिवासी वर भेदभाव होत असतो.यांना जाणून बुजून पुढे जळगांव ला पाठवित असतात. तरी मा. तहसीलदार चोपडा यांच्यामार्फत मा. जिल्हा अधिकारी जळगाव यांचा कडे चोपडा जिल्हाउप रुग्णालयाचे डॉक्टर प्रशासनावर चौकशी करून लवकरात लवकर कारवाई ची मागणी केलेली आहे व कारवाई करावी.
अन्यथा आदिवासी बांधव रस्त्यावर मोठ्या प्रमाणात उतरेल.
उपस्थित आदिवासी सामाजिक कार्यकर्ता व उपसरपंच प्रमोद बारेला, ग्रामपंचायत सदस्य अनसिंग बारेला व आदिवासी युवा नेते धनंजय भादले यांनी निवेदन दिले आहे.


No comments