एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, चोपडा अंतर्गत अं. वाडी कर्मचाऱ्यांना स्मार्ट मोबाईल फोन वितरण सोहळा संपन्न, तसेच अधिकारी व...
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, चोपडा अंतर्गत अं. वाडी कर्मचाऱ्यांना स्मार्ट मोबाईल फोन वितरण सोहळा संपन्न, तसेच अधिकारी व अं. वाडी कर्मचाऱ्यांना मा. आमदार यांचेकडुन महिला दिनानिमित्त शुभेच्छा
प्रतिनिधी चोपडा
( संपादक :- हेमकांत गायकवाड)
शासनाच्या महिला व बाल विकास विभागाकडुन एकात्मिक बाल विकास सेवा योजना चोपडा कार्यालयांतर्गत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्राप्त झालेल्या स्मार्ट मोबाईल फोन वितरण सोहळा माननीय ताईसो. लताताई चंद्रकांत सोनवणे, आमदार सो. चोपडा यांच्या शुभहस्ते, मा. आण्णासो. चंद्रकांत सोनवणे माजी आमदार, मा. विकास भाऊ पाटील, श्रीमती मंगलाताई पाटील, मा. रावसाहेब पाटील, श्रीमती शितलताई देवराज, मा. राजेंद्र पाटील, मा. गोपाल भाऊ पाटील, मा. गणेश भाऊ पाटील, कैलास बाविस्कर, अण्णु ठाकुर, रावसाहेब पाटील, मा. आर. ओ. वाघ, गट विकास अधिकारी, मा. एस. आर. धनगर, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे उपस्थितीत आज रोजी पंचायत समिती सभागृह, चोपडा या ठिकाणी संपन्न झाला.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयांतर्गत एकुण ३०२ अंगणवाडी केंद्र व मुख्यसेविका ०६ आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मागिल काही काळापासून पोषण अभियानांतर्गत पोषण ट्रॅकर अॅप मध्ये नोंदी होत नसल्यामुळे एकंदरीत कामकाजावर त्यांचा परिणाम होत होता. पोषण अभियानांतर्गत सन २०२३-२४ या अर्थिक वर्षात अंगणवाडी सेविका व मुख्यसेविका यांना सुमारे ३०८ स्मार्ट मोबाईल फोन ताईसो. लताताई चंद्रकांत सोनवणे, आमदार सो. चोपडा यांच्या शुभहस्ते वितरीत करण्यात आलेले आहेत.
तसेच महिला दिनाचे औचित्य साधून ताईसो. लताताई चंद्रकांत सोनवणे, आमदार सो. चोपडा आणि मा. आण्णासो. चंद्रकांत सोनवणे माजी आमदार यांनी महिलांचे हक्क, समाजातील महिलांचे महत्व, लिंग समभाव तसेच महिलांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन उपस्थित सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभच्छा दिल्या.






No comments