चाऱ्याच्या आडून गो तस्करी करणाऱ्या पाच पिकअप गाड्यांवर कारवाई, तर ५२ गुरांची झाली सुटका वैजापूर ते नागलवाडी या रस्त्यावर पाच पिकअप वाहने पक...
चाऱ्याच्या आडून गो तस्करी करणाऱ्या पाच पिकअप गाड्यांवर कारवाई, तर ५२ गुरांची झाली सुटका
वैजापूर ते नागलवाडी या रस्त्यावर पाच पिकअप वाहने पकडली. या वाहनांमध्ये बाहेरून चारा वाहतुक केल्याचे दर्शविले जात होते मात्र प्रत्यक्षात त्या चाऱ्यामध्ये गुरे कोंबण्यात आलेली होती
(संपादक : हेमकांत गायकवाड)
वैजापूर ते नागलवाडी या रस्त्यावर पाच पिकअप वाहने पकडली. या वाहनांमध्ये बाहेरून चारा वाहतुक केल्याचे दर्शविले जात होते मात्र प्रत्यक्षात त्या चाऱ्यामध्ये गुरे कोंबण्यात आलेली होती तर गोरक्षकांनी तस्करांना पकडून पोलिसांच्या स्वाधिन केल्यानंतर बारा तासांनी पोलिसांनी पाचही गाडी चालकांवर गुन्हा दाखल केला असून गोरक्षकांनी सुटका केलेल्या गुरांमध्ये गाई, बैल आणि लहान वासरांचा समावेश होता अन्न पाण्याशिवाय त्यांना पाय बांधून कोंबण्यात आले होते पोलिसांच्या कारवाईनंतर पाचही गाड्यांमधील ५२ गुरांची सुटका करण्यात आली गुरांची तर वाहतुक करणाऱ्या वाहनांची नंबर प्लेट बनावट असल्याचे तपासात निष्पन्न झाले वाहनांच्या समोरच्या भागात महाराष्ट्र पासिंग आणि मागे एमपी पासिंगचे नंबर प्लेट लावण्यात आल्याचे समजते पहाटे ५ वाजता नागलवाडी गावात तीन बोरअंजटी रस्त्यावर एक, चोपडा रस्त्यावर एक अशा एकूण पाच पिकअप गाड्या पकडण्यात आल्या गोरक्षक संग्राम परदेशी, जिग्नेश कंखरे, प्रवीण जैन, पप्पू बडगुजर, निर्मल बडगुजर, विक्की पाटील, मोनु माळी यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी पुढाकार घेवून कारवाईनंतर जखमी गुरांची रामगोपाल गो शाळेत व्यवस्था केली चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर साळवे, ग्रामीण च्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी घटनास्थळी भेट दिली




No comments