चोपडा बौद्ध महासभेचे वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन विश्वरत्न महामानव घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंत...
चोपडा बौद्ध महासभेचे वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
विश्वरत्न महामानव घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त व क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त भारतीय बौद्ध महासभाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त वंदना व अभिवादन
चोपडा प्रतिनिधी
(संपादक:हेमकांत गायकवाड)
चोपडा दि.१४ एप्रील २०२४ रोजी विश्वरत्न महामानव घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त व क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त भारतीय बौद्ध महासभाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त वंदना व अभिवादनाचे कार्यक्रमाचे तसेच चोपडा शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती च्या पदाधिकारीचे भारतीय संविधान प्रास्तविकेची उद्देशिका देवून स्वागत व अभिनंदन करण्यांत आले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तालुकाध्यक्ष बापूराव गिरधर वाणे यांनी स्विकारले. तसेच काही महत्वपूर्ण विषयावर मान्यवरांचे खालील विषयांवर प्रबोधनत्मक व्याख्यान आयोजन करण्यांत आले. संविधानाची जतन व संरक्षण आजच्या काळाची गरज-ॲड.विलास बाविस्कर,बहुजन नायक-प्राध्यापक आधार छगन पानपाटील ,डॉ.बाबासाहेबाचा जीवन प्रवास-करीना विजय शंभरकर यांनी व्याख्यान देवून प्रबोधन केले.तसेच डॉ.बाबासाहेबा विषयी लहान बालके हर्षल राहूल ढिवरे,अर्पणा श्रीकांत सैदाणे,लुम्बिनी प्रविण करनकाळ या विद्यार्थीनी भाषण दिले.संगीत शिक्षक व विशारद नितिन वाल्हे,विशाल सपकाळे,सतिष बोरसे,उत्पलवणी प्रविण सत्तेसा यांनी गीतातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.भारतीय बौद्ध महासभेचे जेष्ठ सल्लागार हितेंद्र बिरबल मोरे यांनी संविधानाचे जतन या विषयी शपथ दिली.
यावेळी सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक व सुत्रसंचलन शहराध्यक्ष भरत भिमराव शिरसाठ यांनी केले.सदर कार्यक्रमास अशोक राजाराम बाविस्कर,शालीकग्राम करंदीकर,सुदाम ईशी,डॉ.उत्तम सोनकांबळे,डॉ.दिलीप सपकाळे,ॲड.चंद्रकांत सोनवणे,संजय साळुंखे,योगेश सनेर,तसेच भारतीय बौद्ध त्यहासभेचे पदाधिकारी उपस्थित तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.अशा पद्धतीने वैचारिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली.शेवटी उपस्थितांचे आभार शालीकग्राम करंदीकर यांनी मानले.



No comments