अंतुर्ली येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालय, ग्रामपंचायत कार्यालय तसेच अनेक संस्था ,कार्य...
अंतुर्ली येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालय, ग्रामपंचायत कार्यालय तसेच अनेक संस्था ,कार्यालय मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती साजरी करण्यात आली
किरण पाटील प्रतिनिधी मुक्ताईनगर
(संपादक: हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे विविध ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती साजरी करण्यात आली .अंतुर्ली येथील ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालय, ग्रामपंचायत कार्यालय तसेच अनेक संस्था ,कार्यालय मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती साजरी करण्यात आली .तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला अंतुर्ली येथील ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती साजरी करण्यात आली .यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस सेवानिवृत्त अभियंता जे.एस. आप्पा पाटील यांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी वाचनालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. अंतुर्ली येथे संध्याकाळी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरुवात झाली नंतर बस स्टँडवरून वेगवेगळ्या वार्डातुन मिरवणूक नेण्यात आली याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक, समाजबांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments