adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दोंडाईचा पोलीस ठाण्यातील लाचखोर पोलीस निरीक्षकांसह दोन हवालदारांना लाच घेताना रंगेहाथ अटक

  दोंडाईचा पोलीस ठाण्यातील लाचखोर पोलीस निरीक्षकांसह दोन हवालदारांना लाच घेताना रंगेहाथ अटक सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक...

 दोंडाईचा पोलीस ठाण्यातील लाचखोर पोलीस निरीक्षकांसह दोन हवालदारांना लाच घेताना रंगेहाथ अटक

सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर,अपर पोलीस अधीक्षक माधव रेडडी व वाचक पोलीस अधीक्षक नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले 



शिंदखेडा प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे,पोलीस हवालदार नितीन मोहने व पोलीस हवालदार अशोक पाटील यांनी तक्रारदार यांचेकडून तडजोडीअंती १,५०,०००/- रु. लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम पोलीस हवालदार नितीन मोहने यांचे हस्ते स्विकारतांना रंगेहाथ पकडले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार हे दोंडाईचा ता.शिंदखेडा जि.धुळे येथील रहिवाशी असुन तक्रारदार हे राजकिय व सामाजिक चळवळीत सक्रिय आहेत.तक्रारदार यांचे त्यांच्या राजकिय सहका-यांशी मतभेद झाल्याने राजकिय आकसाने त्यांचे विरुध्द दोंडाईचा पो.स्टे.येथे राजकिय गुन्हे दाखल झाले आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार नितीन मोहने व पोलीस हवालदार अशोक पाटील यांनी तक्रारदार यांची भेट घेवुन त्यांना तुझ्यावर यापुर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती काढुन तसेच तुझ्यावर गुन्हे नोंद करुन लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता पार्श्वभुमीवर पोलीस स्टेशन कडुन प्रस्ताव मागवुन तुला जिल्ह्यातुन हद्दपार करणार असल्याचे सांगुन कारवाई होवु द्यायची नसेल तर पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे साहेबांना २,००,०००/- रुपये दयावे लागतील असे सांगुन तक्रारदार यांना पोलीस निरीक्षक शिंदे यांची भेट घेण्यास सांगितले.बाबत तक्रारदार यांनी दि.०१/०४/२०२४ रोजी ला.प्र.वि.धुळे कार्यालयाकडे तक्रार दिली होती.

तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीचे अनुषंगाने दि.०१/०४/२०२४ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय,धुळे येथील स्थानिक गुन्हे शाखेत जावुन पडताळणी केली असता पोलीस निरीक्षक दत्तात्रय सखाराम शिंदे,यांनी तक्रारदार यांचेकडुन पंचासमक्ष २,००,०००/- रुपये लाचेची मागणी करुन सदरची रक्कम पो.हवा.नितीन आनंदराव मोहने व पो.हवा.अशोक साहेबराव पाटील,यांना देण्यास सांगुन सदर लाचेची रक्कम पो.हवा.नितीन मोहने व पो.हवा.अशोक पाटील यांनी तडजोडीअंती १,५०,०००/- रुपये लाचेची रक्कम दि.०१/०४/२०२४ रोजी सायंकाळी दोंडाईचा येथील दोंडाईचा धुळे रस्त्यालगत असलेल्या जैन मंदिरा समोरील मोकळया जागेत पो.हवा.मोहने यांनी पंचासमक्ष स्वतः स्विकारलेली असुन त्यांचे विरुध्द भ्र.प्र.अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी,पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे तसेच पथकातील राजन कदम,मुकेश अहिरे,संतोष पावरा,रामदास बारेला,प्रविण मोरे,प्रशांत बागुल, प्रविण पाटील,सुधीर मोरे,जगदीश बडगुजर यांनी केली आहे.

सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर,अपर पोलीस अधीक्षक माधव रेडडी व वाचक पोलीस अधीक्षक नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे.

No comments