adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शेख अजगर यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा बहुजन मुक्ती पार्टी ची मागणी

  शेख अजगर यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा शेख अजगर यांच्या मृत्यूची वरिष्ठ पातळीवरून चौकशी होऊन त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा बहुजन...

 शेख अजगर यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा

शेख अजगर यांच्या मृत्यूची वरिष्ठ पातळीवरून चौकशी होऊन त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा बहुजन मुक्ती पार्टी ची मागणी


किरण पाटील मुक्ताईनगर प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

   शेख अजगर  शेखअकबर यांचा मृत्यू होऊन एक महिना उलटल्यावर सुद्धा अद्याप पोलिसांना कुठलाही धागा दोरा सापडलेला नाही .शेख अजगर शेख अकबर हे मुक्ताईनगर मध्ये त्यांच्या दोन मुल आणि आई वडिलांसह वास्तव्यास होते तसेच गेल्या चार-पाच  महिन्यापासून पंचायत समितीमध्ये महिला व बाल संगोपन विभागात कंत्राटी बेसवर नोकरी करून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते .नेहमीप्रमाणे दिनांक 1/3/2024 रोजी शेख असगर हे आपली गाडी व बॅग घेऊन कामावर जातो असे घरी सांगून गेले परंतु शेख असगर कामावर पोहोचलेच नाही किंवा त्यांचा कुणाशीही संपर्क झाला नाही किंवा दिवसभरात ते कुणालाही भेटले दिसले सुद्धा नाही .दिनांक 2/3/2024 रोजी त्यांचा मृतदेह आणि त्यांची मोटरसायकल कुऱ्हा रोडवरील डोलारखेड गावाजवळ सकाळी सुमारे साडेपाच वाजता प्रथमता रस्त्याने जाणाऱ्यांना दिसले लागलीच त्यांनी त्यांचे फोटो व्हाट्सअप द्वारे ग्रुप वर टाकले त्यामुळे या प्रकरणाची माहिती त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचली घटनास्थळ पाहता त्या ठिकाणी कुठलेही अपघात झाल्याचे दिसत नाही त्यांच्या गाडीचे कुठेही नुकसान सुद्धा झालेले नाही म्हणून हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्याने त्यांचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव या ठिकाणी पाठवण्यात आलेला होता .सदर घटनेत जर अपघात झालेला असेल तर मयताच्या गाडीचे कुठेही नुकसान का नाही किंवा मयताचे अंगावर सुद्धा इतरत्र कुठेही मार लागल्याचे आढळलेले नाही जर अपघात झाला असेल तर त्यांनी घरून सोबत नेलेली त्यांची ऑफिस बॅग सुद्धा त्याच ठिकाणी मिळायला हवी होती परंतु अद्याप पर्यंत त्यांची बॅग सुद्धा मिळून आलेली नाही आणि त्यांचा मोबाईल सुद्धा त्यांच्या घरी त्यांच्याच  खिशामध्ये मिळून येणे मग ते कामावर जात असताना किंवा कोणीही व्यक्ती घराच्या बाहेर पडत असताना मोबाईल हा सोबत घेतल्याशिवाय घराबाहेर पडत नाही आणि शेख असगर यांचे बहुतांश काम हे मोबाईल वरून लोकांची कागदपत्रे ऑनलाईन करत असत त्यामुळे त्यांचा मोबाईल घरी विसरणे शक्य नाही शेख असगर यांचा मृतदेह ज्या परिसरात मिळून आलेला आहे त्या ठिकाणी ते का गेले असावे त्यांचा अपघातच झालेला आहे किंवा घातपात झालेला आहे हे अद्याप पोलिसांकडून स्पष्टपणे माहिती मिळू शकलेली नाही तरी या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी होऊन मृताच्या नातेवाईकांना न्याय मिळावा या विषयाचे निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी शेख अकबर शेख याकूब, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे तालुका अध्यक्ष इरफान बागवान, जाकिर शेख जाबिर, इमरान पटेल, मन्यार बिरदरीचे जिल्हाध्यक्ष हकीम चौधरी, शेख कलीम मण्यार अहमद मन्यार ठेकेदार, आतीक खान ,शिवसेनेचे महाराष्ट्र अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष अफसर खान, अरमान शेख कादर, आमिर खान, एजाज शेख, बुडन ठेकेदार, शब्बीर शेख शकूर, प्रमोद सौंदळे, मुक्ती मोर्चाचे विभागीय अध्यक्ष नितीन गाढे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.




No comments