adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

विवाहितेस सासर कडील मंडळी कडून मारहाण

  विवाहितेस सासर कडील मंडळी कडून मारहाण माझे पती कुठ आहे त्यांना मुलांची आठवण येत नाही का  विचारायला गेलेल्या विवाहितेस सासर कडील मंडळी कडून...

 विवाहितेस सासर कडील मंडळी कडून मारहाण



माझे पती कुठ आहे त्यांना मुलांची आठवण येत नाही का  विचारायला गेलेल्या विवाहितेस सासर कडील मंडळी कडून मारहाण

अमोल बावस्कार (मलकापूर प्रतिनिधी)

(संपादक : हेमकांत गायकवाड)

मलकापूर:-

 सन २०१९ साली जागृती हीचे लग्न नितीन वासुदेव इंगळे याचे सोबत झाले असून त्यांच्या पासून तिला जुळवे मुलगा मुलगी आहे  पती सोबत पटत नसल्याने ती मागील गेल्या एक वर्षापासुन  तिच्या आई वडीलांकडे राहत असून दिनांक ०६/०४/२०२४ रोजी संध्याकाळी ०६:०० वाजेच्या सुमारास विवाहिता जागृती ही सासरी गजानन नगरी मलकापूर येथे तिचा मुलांसह गेली व तिच्या सासु व सासरे यांना घराच्या समोर येवून विचारले की,माझे पती कुठे आहे व त्यांना मुलांची व माझी आठवण येत नाही का त्यावेळेस त्यांनी सांगीतले की,तुझे पती सिंगापुरला गेले आहे.असे म्हटल्यावर ती त्यांना म्हटले की तुम्ही माझ्या पती यांना फोन लावा व मला व मुलांना घ्यायला केव्हा येतात असे विचारा असे म्हटले असता तिचे सासरे वासुदेव गोंडुजी इंगळे व त्यांचा लहान मुलगा सचिन वासुदेव इंगळे वय 29 वर्ष यांनी सांगीतले की,तो तुला वागवत नसून तु येथून निघुन जा ती तेथेच थांबली म्हणुन तिचे ननद अनिता दिलीप दोळे,देराणी शुभांगी सचिन इंगळे ह्या तिच्या अंगावर धावून आल्या व त्यांनी  शिवीगाळ करून चापट बुक्यानी मारहाण करून,जमीनीवर पाडुन झटापटी मध्ये दोन्ही हाताचे दंडाचे कपडे फाडले व ननद अनिता दोळे तसेच देराणी शुभांगी इंगळे यांनी अश्लील भाषेत आरोप प्रत्यारोप करत आम्ही तुला वागवत नाही असे म्हटले तेवढ्यात विवाहिता जागृती हिचे वडील पांडुरंग किसन जाधव व आई नलु पांडुरंग जाधव तेथे आले असता त्यांचे तावडीतुन सोडविले त्यावेळेस  सासरे वासुदेव इंगळे व देर सचिन इंगळे यांनी विवाहितेचा वडीलांना गालावर व तोंडावर चापट बुक्यांनी मारहाण केली.तसेच  देरानी शुभागी इंगळे हिने आईच्या कमरेवर लाथ मारली त्यामुळे तिचे कमरेवर मुका मार लागला. व सासरा तसेच देर यांनी,अश्लिल भाषेत शिवीगाळ केली असता विवाहित जागृती हिने तिची आई वडिलांनी सोबत घेऊन मलकापूर पोलिस स्टेशन येथे धाव घेतली व सासर कडील मंडळी यांच्या नावाची तक्रार नोंदवली असता त्यांच्यावर अधिनियम भारतीय दंड संहिता १८६० नुसार कलम २९४,३५२,५०४,३४ लावण्यात आली पुढील तपास मलकापूर शहर पोलिस स्टेशन हेड कॉन्स्टेबल संजय वेरुळकर करत आहे.




No comments