जन मानवता बहुउद्देशीय संस्था आणि कॅन्सर पेशंट हेल्प सेन्टर तर्फे कॅन्सर ग्रस्त परिवाराला राशन किट वाटप जन मानवता बहुउद्देशीय संस्था व कॅन...
जन मानवता बहुउद्देशीय संस्था आणि कॅन्सर पेशंट हेल्प सेन्टर तर्फे कॅन्सर ग्रस्त परिवाराला राशन किट वाटप
जन मानवता बहुउद्देशीय संस्था व कॅन्सर पेशनट हेल्प सेन्टर गेल्या 12 वर्षा पासून सामाजिक उपक्रमात सहभागी आहे
चोपडा प्रतिनिधी
(संपादक: हेमकांत गायकवाड)
दरवर्षी प्रमाणे यावर्षी हि जन मानवता बहुउद्देशीय संस्था, आणि कॅन्सर पेशनट हेल्प सेन्टर तर्फे कॅन्सर ग्रस्त परिवाराला राशन किट वाटप करण्यात आले या वेळी संस्थे चे अध्यक्ष राज मोहम्मद खान शिकलगर, शेख जलीस अहेमद, डॉ नवाज शाह ,मुराद खान शिकलगर, मोहसीन अहेमद, शफीक शाह, गुलाम नबी मिस्त्री ,मोईन पेंटर, हाफिज मलीक उपस्थित होते
जन मानवता बहुउद्देशीय संस्था व कॅन्सर पेशनट हेल्प सेन्टर गेल्या 12 वर्षा पासून सामाजिक उपक्रमात सहभागी आहे ,करोना चा काळात ही संस्थेने उल्लेखनीय कार्य केले होते संस्थे तर्फे दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात त्या मधे कॅन्सर ग्रस्त परिवारातील विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, दिवाळी, आणि रमजान, मधे राशन किट ,कॅन्सर ग्रस्त परिवारातील मुलींना लग्न कार्यात मदद ,उपचारा साठी मदद व मार्गदर्शन, तसेच कॅन्सर या आजारा विषयी जनजागृती व व्यसनमुक्ती साठी विविध उपक्रम राबविले जातात या समाजभिमुख उपक्रम राबविण्या करिता दानशूर व्यक्ती जन मानवता बहुउद्देशीय संस्थे ला आर्थिक मदद आणि अमूल्य असा मार्गदर्शन करतात
या कॅन्सर पेशनट हेल्प सेन्टर आणि जन मानवता बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राज मोहम्मद खान शिकलगर स्वतः कॅन्सर ग्रस्त असून कॅन्सर वर यशस्वीपणे मात केल्यानंतर त्यांनी या संस्थेची स्थापना केली महिन्यातून 12 दिवस या अभियान साठी त्यांनी राखीव ठेवले आहे व्यसनमुक्ती,तंबाखू गुटखा विरोधी अभियानात व कॅन्सर जनजागृती अभियानात त्यांचे उत्तर महाराष्ट्रात उल्लेखनीय कार्य आहे

No comments