adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बॅरिकेड्सला धडक देवून पळ काढणाऱ्या वाहनास पकडले

  सत्रासेन फॉरेस्ट नाक्यावर नाकाबंदी दरम्यान एका संशयित चारचाकी वाहनाची कारची बॅरिकेड्स ला धडक   बॅरिकेड्सला धडक देवून पळ काढणाऱ्या वाहनास प...

 सत्रासेन फॉरेस्ट नाक्यावर नाकाबंदी दरम्यान एका संशयित चारचाकी वाहनाची कारची बॅरिकेड्स ला धडक

 बॅरिकेड्सला धडक देवून पळ काढणाऱ्या वाहनास पकडले



प्रतिनिधी चोपडा

(संपादक हेमकांत गायकवाड)

आज दिनांक ०२/०४/२०२४ रोजी मा. पो.नि. सो कावेरी महादेव कमलाकर मॅडम यांनी पो कॉ /चेतन सुरेश महाजन तसेच सपोनि शेषराव नितनवरे, पोको  रावसाहेब पाटील यांना फोन करुन पो स्टे ला बोलावुन घेवून कळविले की मला सत्रासेन फॉरेस्ट नाक्यावर नाकाबंदी करत असलेले पोहवा/अशोक विजय यादव यांनी फोन वरुन कळविले आहे की, एक ग्रे कलरची चारचाकी कार ही बॅरिकेट्स ला धडक देवुन चोपडा गावाकडे पळुन आली आहे. तरी आतता आपल्याला सदर वाहन मिळुन आल्यास ते पकडून कारवाई करणे आहे असे कळविल्याने मा. पो.नि.सो कावेरी कमलाकर मॅडम यांनी रात्रगस्तकामी असलेले सफी/ यांना वाहनासह पो स्टे ला बोलावून घेतले त्यानंतर  ४.४७ वाजता शासकीय चारचाकी वाहन क्रमांक एम एच १९ सी झेड ८५९० ने  मा. पो.नि.सो कावेरी कमलाकर मॅडम, सपोनि शेषराव नितनवरे, पोहवा/ शिवाजी बाविस्कर, पोकाॅ/चेतन महाजन   पोको /रावसाहेब पाटील, व चालक पोको /कमलेश बाविस्कर असे पथक रवाना झाले सुमारे पहाटे ५.१५ वा चे सुमारास मजरे हिंगोणा गावाजवळ पोलिस पथक पोहचल्यावर तेव्हा समोरुन एक चारचाकी वाहन आल्याचे दिसले तेव्हा सदर वाहन चालकास समोरुन पोलीस गाडी येत असल्याचे समजल्याने त्याने त्याचे वाहन हे मजरे हिंगोणा गावाचे शिवारातील शेताचे कच्या रस्त्याला लावून अंधाराचा फायदा घेवुन तो तेथून पळून गेला असुन तेव्हा सदरचे वाहन निदर्शनास आले असता त्याचा नंबर एम एच १२ एफ एफ १९८ असा होता. सदर वाहनात काय आहे हे पाहिले असता त्यामध्ये ६ तपकिरी रंगाचे कॉटनटेप गुंडाळलेले बॉक्स मिळून आले त्यामधील १ बॉक्स मा. पो.नि.सो यांनी कटरच्या सहाय्याने फाडुन त्यात काय आहे हे पाहिले असता त्यामध्ये गांजा सदृश्य वनस्पती असल्याचे आढळुन आल्याने सदर ५ बॉक्स फाडुन न पाहता मा. पो. नि. सो यांनी पोकॉ/ रावसाहेब पाटील यांना सदर वाहनावर लक्ष ठेवणेस सांगीतले व मा. पो.नि.सो. कावेरी कमलाकर मॅडम, सपोनि शेषराव नितनवरे, सफी/, शिवाजी बाविस्कर असे पो स्टे ला परतल्यावर  मा. पो.नि सो यांनी मा. उपविभागीयपोलीस अधिकारी सो चोपडा, मा. तहसिलदार सो चोपडा, व मा. गटविकास अधिकारी सो पंचायत समिती चोपडा यांना फोनद्वारे माहिती दिली. व सदर कारवाई करण्यासाठी पोकों/किरण अशोक पारधी यांना मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो चोपडा भाग चोपडा यांची एन डी. पी. एस. सदराखाली कारवाई करणेकामी संमती मिळणेबाबत जा.क्र ६१९/२०२४ अन्वये पत्र देवुन त्यांना लेखी आदेश दिले तसेच सफी/, शिवाजी बाविस्कर यांना मा. तहसिल कार्यालय चोपडा येथे राजपत्रीत अधिकारी म्हणुन हजर राहणेबाबत जा. क्र. ६२०/२०२४ अन्वये पत्र देवून त्यांना लेखी आदेश देवून रवाना केले, पोकॉ/चेतन महाजन यांना मा. गटविकास अधिकारी पंचायत समिती चोपडा यांचेकडील दोन पंच मिळणेबाबत जा क्र ६२१/२०२४ अन्वये रिपोर्ट देवुन लेखी आदेश दिला. तसेच पोकों/ गजानन मच्छिंद्र पाटील यांना इलेक्ट्रीक वजनकाटा व वजनकाटा धारक तसेच फोटोग्राफर यांना पो स्टे ला हजर ठेवणेबाबत लेखी आदेश दिले तसेच पोकॉ/ प्रमोद अर्जुन पारधी यांना लॅपटॉप प्रिंटर व सिल साहित्य, पो स्टे चा पितळी सिल शिक्का व आवश्यक ते सिल साहित्य हजर करणेबाबत लेखी आदेश दिला.

 मा. गटविकास अधिकारी पंचायत समिती चोपडा यांचे कार्यालयास पत्र देवून त्यांचे कार्यालयाचे दोन शासकिय पंच १) नितीन सुकलाल चौधरी वय ५० वर्षे धंदा आरोग्य सेवक, पंचायत समिती चोपडा २) गुणवंत डिंगबर देवराज वय ४२ धंदा कनिष्ठ सहाय्यक, पंचायत समिती चोपडा यांना घेवुन मा. पो.नि. सो यांचे समक्ष हजर केले. तसेच पोकों/ किरण पारधी यांनी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे संमती पत्र प्राप्त करुन मा. पो.नि.सो यांचे समक्ष हजर केले, सफी/ शिवाजी बाविस्कर यांनी राजपत्रीत अधिकारी म्हणुन तहसिल कार्यालयाचे मंडळ अधिकारी लासुरचे रविंद्र जगन्नाथ बेलदार यांचेसह हजर झाले, पोकॉ/ प्रमोद अर्जुन पारधी हे लॅपटॉप प्रिंटर व सिल साहित्य, पो स्टे चा पितळी सिल शिक्का व आवश्यक ते सिल साहित्य घेवुन मा. पो.नि.सो यांचे समक्ष हजर झाले, पोको /गजानन पाटील यांनी इलेक्ट्रीक वजन काटा व वजनकाटा धारक शेख इजाज शेख नवी रा. हमीद नगर, चोपडा, फोटोग्राफर महेंद्र नवलदास गुरव रा. गुरव गल्ली शनि मंदिर जवळ चोपडा यांना हजर केले. मा. पो.नि.सो यांनी सर्वांना घडले प्रकाराबाबत थोडक्यात माहिती सांगुन पो. नि. कावेरी कमलाकर मॅडम, राजपत्रीत अधिकारी, फोटोग्राफर, वजनकाटा धारक, पंच, असे पोलीस स्टेशन येथुन पो स्टे चे सरकारी  वाहनाने तसेच वरील स्टाफ  खाजगी वाहनाने मजरे हिंगोणा गांवी घटनास्थळी रवाना झाले.पोलिस पथक मजरे हिंगोणा, ता. चोपडा या गावाचे शिवारातील घटनास्थळी दाखल झाले तेव्हा तेथे आदेश दिले प्रमाणे पोकॉ / रावसाहेब पाटील हे घटनास्थळी हजर होते व त्यांचे सोबत पोहकाॅ/ अशोक विजय यादव, नेमणूक पोलीस मुख्यालय जळगांव, पोकॉ/चंद्रकांत वानखेडे नेमणुक पोलीस मुख्यालय जळगांव हे सुध्दा हजर होते. तेव्हा सदर याहन क्रमांक एम एच १२ एफ एफ १९८ ची मा. पो. नि. कावेरी कमलाकर मॅडम यांनी राजपत्रित अधिकारी, पंच, यांचे समक्ष व स्टाफचे मदतीने तपासणी केली असता सदर वाहनाचे चालकाचे मागील सिट व त्याला असलेले सपोर्ट सिट मध्ये कप्पे केलेल्या ठिकाणी ठेवलेले ६ तपकिरी रंगाचे कॉटनटेप मध्ये गुंडाळलेले बॉक्स हे मिळून आल्याने त्यातील एक वीक्य हा मा. पो.नि.सो. यांनी फोडून पोहिलेला व उर्वरित ५ बॉक्स हे हजर असले राजपत्रीत अधिकारी, शासकिय पंच, व फोटोग्राफर, वजनकाटा धारक यांचे समक्ष फोडुन पाहिले असता त्यामध्ये हिरवट रंगाचा थोडा ओलसर गांजा वनस्पतीचा पाला व त्यास फूल बिया असलेला मिळुन आला तो घटनास्थळी हजर असलेले मोबाईल फॉरेन्सीक यूनिट स्थानिक गुन्हे शाखा जळगांव, येथील पोहकॉ / रफिक शेख, पोहकॉ/  निलेश भावसार, पोकों /हरिश परदेशी यांनी त्यांना पुणे गुन्हे अन्वेषण विभागाकडून प्राप्त नॉकोटीक्स ड्रग्स डिटेक्शन किट च्या सहाय्याने सदर कार मधील मिळुन आलेल्या गांजा सदृश्य वनस्पतीची प्राथमिक तपासणी केली असता त्यांनी सदर वनस्पती ही Liquid Layer indicate a positive result ignor colour of the apper layer Marijuana Positive असा असल्याचे सांगीतले आहे. तरी सदर कारमध्ये मिळून आलेल्या गांजाचे वर्णन खालीलप्रमाणे.

१) ७७,१००/- रुपये किमतीचा ६ तपकिरी रंगाचे कॉटनटेप मध्ये गुंडाळलेला तो कटरच्या सहाय्याने कापून पाहिले

असता त्यामध्ये हिरवट रंगाचा थोडा ओलसर गांजा वनस्पतीचा पाला व त्यास फुल बिया

असलेला त्याचे वजन वजन काटा धारक शेख इजाज शेख नबी याचेकडून केले असता सदर गांजा वनस्पतीचे प्रमाणित वजन १२ किलो ८५० ग्रॅम एवढे वजन असलेला त्याचा प्रती किलो भाव ६०००/- रुपये प्रमाणे असे एकूण ७७,१००/- रु.चा असुन सदर गांज्याला गुंडाळलेल्या तपकिरी रंगाचे कॉटनटेपचे वजन केले असता ३७० ग्रॅम असुन सदर जप्त गांजा मधुन प्रत्येकी १०० ग्रॅम वजनाचे तीन कागदी पाकोट, रासायनिक विश्लेषणासाठी, मा. न्यायालयाचे कामकाजासाठी, व एक पो स्टे रेकॉर्डवर ठेवण्यासाठी कागदी पाकीटात काढून सदरचे पॉकेट पो स्टे चे सिलने जागीच लाख मोहर लावून सिलबंद केले. व उर्वरित जप्त गांजा व ६ तपकिरी रंगाचे कॉटनटेप हे हिरव्या रंगाचे प्लॅस्टिकचे पिशवीत टाकुन जागीच लाख मोहरलावुन सिलबंद केलेले. २,०००००/- रु.कि.ची एक ग्रे कलरची CHEVROLET कंपनीची कार तीचा आर टी ओ पासिंग क्रमांक एम एच १२ एफ एफ १९८ असा असलेली जु.वा.कि. अ .२,७७,१००/- येणेप्रमाणे वरील वर्णनाचा व किंमतीचा गांजा व मोटार कार मिळुन आल्याने मा. पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर मॅडम यांनी हजर असले दोन पंच व राजपत्रीत अधिकारी, यांचे समक्ष जप्त करुन त्यावर त्यांचे व पंचाचे, राजपत्रीत अधिकारी यांच्या सह्याचे व पो स्टे चे लाखेचे सिल करुन सविस्तर पंचनामा केला असून सदर सिलबंद केलेला गांजा व मोटार कार ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला स्टाफसह घेवुन आणले आहे. तरी  गांजा व मोटार कार क्रमांक एम एच १२ एफ एफ १९८ ही घटनास्थळी, मजरे हिंगाणा ता. चोपडा गावातील शिवारातील शेताचे कच्या रस्त्यावर पहाटे ५.१५ वा चे सुमारास सोडुन पळुन गेलेल्या कारचालक इसमाविरुध्द गुंगी कारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम सन १९८५ चे कलम २० (ब) व २२ प्रमाण कायदेशिर फिर्याद दाखल करण्यात आली आहे

No comments