adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जुगारुचा खेळाचा पोलीसांनी डाव उधळला

  जुगारुचा ५२ पत्यांचा खेळ  विशेष पोलीस महानिरीक्षक,नाशिक परिक्षेञ नाशिक पथकातील अधिकारी व चोपडा शहर पोलीसांनी डाव उधळला चार लाख चवतीस हजारा...

 जुगारुचा ५२ पत्यांचा खेळ

 विशेष पोलीस महानिरीक्षक,नाशिक परिक्षेञ नाशिक पथकातील अधिकारी व चोपडा शहर पोलीसांनी डाव उधळला

चार लाख चवतीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत 



चोपडा प्रतिनिधी 

(संपादक: हेमकांत गायकवाड)

चोपडा शहर पोस्टे.दि. ०२/०४/२०२४

डॉ.बी.जी.शेखर पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक,नाशिक परिक्षेत्र नाशिक यांनी परिक्षेत्रातील अवैध धंदे यांचे उच्चाटन करण्यासाठी नेमणुक केलेले पथक व स्थानिक चोपडा शहर पोस्टेचे अधिकारी व अंमलदार यांनी छापा कारवाई करुन दि.०२/०४/२०२४ रोजी १५.३० वाजेच्या सुमारास चोपडा शहर पोलीस स्टेशन हद्दीत चोपडा नगरपरिषदच्या पाठीमागे, हॉटेल कान्हाच्या बाजुला भरत देशमुख यांचे पत्र्यांचे शेडलगत मोकळ्या जागेत इसम नामे लक्ष्मण बावीस्कर,खुशाल बावीस्कर,अजय माळी,वाल्मिक शिंदे,अमोल जैन,हिरालाल बावीस्कर,सागर पाटील,प्रविण बावीस्कर,प्रदिप महाजन,अनिल लोहार, सुधाकर सोनवणे,आकाश कोळी,योगेश भोई व इतर पळुन गेलेले काही इसम असे बेकायदेशीर अवैध रित्या स्वःताच्या फायद्यासाठी ५२ पत्यांच्या कॅटवर पैसे लावुन घेवुन तिरट नावाचा जुगाराचा खेळ खेळतांना व खेळवितांना एकुण ४,३४,०००/- रू.कि.चा मुद्देमालासह मिळुन आले आहेत.सदर बाबत चोपडा शहर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १२६/२०२४ महा.जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची तजविज असुन सदर कारवाई ही डॉ.बी.जी. शेखर,विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली त्यांचे विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार तसेच स्थानिक चोपडा शहर पोस्टेचे अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

No comments