जिल्हा बँकेने विकासोमार्फतच कर्ज पुरवठा करावा अन्यथा तीव्र आंदोलन..... शेतकरी संघटनेचा इशारा संदीप पाटील विभागीय अध्यक्ष, शेतकरी संघटना ज...
जिल्हा बँकेने विकासोमार्फतच कर्ज पुरवठा करावा अन्यथा तीव्र आंदोलन..... शेतकरी संघटनेचा इशारा

संदीप पाटील
विभागीय अध्यक्ष, शेतकरी संघटना
जिल्हा बँकेने स्वतः कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय म्हणजे सहकार चळवळ मोडीत काढण्याचा निर्णय आहे.
चोपडा प्रतिनिधी
(संपादक: हेमकांत गायकवाड)
गेल्या दहा दिवसांपासून जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अनिष्ट तफावतीत गेलेल्या विकासो ना कर्ज पुरवठा न करता जिल्हा बँकेने स्वतः कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय म्हणजे सहकार चळवळ मोडीत काढण्याचा निर्णय आहे.
जिल्ह्यातील २९१ विकासो अनिष्ट तफावतीत आहे "त्या" बंद पाडून त्यांच्या ३९९० संचालकांना नामधारी बनवण्याचा हा निर्णय आहे घेतला असून २९१ गट सचिवांना बेरोजगार करण्याचें काम जिल्हा बँक करत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष संदीप पाटील यांनी केला आहे.
जळगाव जिल्ह्यात दुष्काळ असतानाही विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या बहुसंख्य शेतकरी सभासदांनी मार्च 2024 अखेर कोणत्याही प्रकारचे उत्पन्न नसताना बाहेरून व्याजाचे पैसे काढून सोसायटीचे कर्ज फेडली सोसायटीच्या सचिवांनी देखील अक्षरशः जीवाची रान करून जास्तीत जास्त वसुली केली सभासदांना आठ ते दहा दिवसांच्या कालावधीत कर्ज मिळेल असे आश्वासन सचिवांनी दिलेले असताना आताच्या धोरणात बदल केला आहे बँकेकडूनच शेतकरी सभासदांना कर्ज दिले जाणार असल्याने शेतकरी संभ्रमात सापडला आहे बँकेने योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहे निसर्गाच्या व कृपेमुळे उत्पन्न झिरो टक्के आहे ज्यात ज्यांच्याकडून अपेक्षा होती विकास सोसायटी मधून कर्ज मिळणार नसल्याने दुष्काळात तेरावा महिना या म्हणीचा प्रत्येक येतो आहे.
जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन सोसायटीकडून कर्ज वसुली करून घेतली घेतली कर्ज वसुली पूर्वी बँकेने विकास संस्थामार्फत कर्ज वाटप करण्यात येईल असे वारंवार सांगितले जिल्हा बँके शेतकऱ्यांची असून शेतकरी हिताची निर्णय घेतले पाहिजे एकूण सध्या कर्ज मिळण्यासंदर्भात निर्माण झालेले वातावरण पाहता जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांच्या सहसंचालकांनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन सोसायटीच्या माध्यमातून सभासदांना पूर्वीसारखेच कर्ज वाटप सुरू करावे अशी मागणी शेतकरी करीत आहे .
शेतकऱ्यांच्या मागण्यांप्रमाणे जिल्हा बँकेने त्वरित आपला निर्णय बदलून येत्या 22 तारखेपर्यंत विविध कार्यकारी सोसाटनमार्फत कर्ज वाटपाचा निर्णय घ्यावा अन्यथा येणाऱ्या दिवसात शेतकरी संघटना हजारो शेतकऱ्यांना घेऊन जिल्हा बँकेत या आंदोलन करेल असा इशारा शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष संदीप पाटील यांनी दिलेला आहे.
प्रतिक्रिया
गेल्यावर्षी प्रती सभासद २४५ रुपये प्रोसेसिंग फी व १५५ रुपये सिबिल स्कोर चेक करण्याची फी असे एकूण ४०० रुपये जमा केले होते ते पैसे सभासदांना परत करण्याचे आश्वासन दिले होते मात्र ते पैसे अजूनही जिल्ह्या बैंकेने परत केले नाहीत तसेच विकासो मार्फत कर्ज वाटप केल्यास २% रक्कम विकासो ला मिळते त्यातून त्यांचे पगार व खर्च भागविण्यासाठी पैसे वापरले जातात आता त्या २% रक्कमेवर जिल्हा बँकेने नजर ठेवून हा चुकीचा निर्णय घेतला आहे.
जिल्हा बँकेने त्वरित निर्णय बदलून विकासो मार्फत कर्जवाटप करावी अन्यथा येणाऱ्या २५ एप्रिल नंतर शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल
संदीप पाटील
विभागीय अध्यक्ष, शेतकरी संघटना
No comments