वनविभागाच्या कृत्रिम पाणवठ्यांमध्ये टँकरने केला जातोय पाणीपुरवठा..! चोपडा तालुक्यातील वनविभागातील वैजापूर वनपरिक्षेत्रा मध्ये पाण्याचे स्र...
वनविभागाच्या कृत्रिम पाणवठ्यांमध्ये टँकरने केला जातोय पाणीपुरवठा..!
चोपडा तालुक्यातील वनविभागातील वैजापूर वनपरिक्षेत्रा मध्ये पाण्याचे स्रोत आटल्याने वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती
चोपडा प्रतिनिधी
(संपादक:हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील वनविभागातील वैजापूर वनपरिक्षेत्रा मध्ये पाण्याचे स्रोत आटल्याने वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.त्यामुळे वैजापूर शिवारातील जंगलात कृत्रिम पाणवठ्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे.
जंगालात पाणी नसल्याने वन्य प्राणी तहान भागवण्यासाठी शेतांमध्ये धाव घेतात.वन्यजीवांची पाण्यासाठी भटकंती थांबावी,तहान भागावी यासाठी वैजापूर वनपरिक्षेत्र यांच्याकडून वनविभागातील कृत्रिम पाणवठ्यात पाणी टाकले जात आहे.तसेच उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव.जमीर शेख,यावल वनविभाग जळगाव.सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे,वैजापूर वनपरिक्षेत्र अधिकारी.समाधान सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर वनपरिक्षेत्र मध्ये वन्यजीवांच्या साठी कुत्रीम पाणवठ्यांमध्ये पाणी पुरवठा करण्यात आले.के.वाय.शेख वनपाल खा-यापाडाव,सी.आर.कोळी वनरक्षक,संदिप ठाकरे,वनरक्षक. वंदना बारेला वनसंरक्षक यांचे सहकार्य लाभले.


No comments