Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गुजरातमधून भारतीय जनता पक्षासाठी आनंदाची बातमी

  गुजरातमधून भारतीय जनता पक्षासाठी आनंदाची बातमी  भाजपचा बिनविरोध विजय त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपचे खातेही उघडले  मुकेश दलाल सुरत येथून ...

 गुजरातमधून भारतीय जनता पक्षासाठी आनंदाची बातमी 


भाजपचा बिनविरोध विजय त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपचे खातेही उघडले मुकेश दलाल सुरत येथून भाजपचे उमेदवार  

 सुरत प्रतिनिधी 

(संपादक: हेमकांत गायकवाड)


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधून भारतीय जनता पक्षासाठी आनंदाची बातमी आली आहे. सुरत लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवाराचा अर्ज रद्द झाल्यानंतर उर्वरित ८ उमेदवारांनीही आपली नावे मागे घेतली असून, त्यानंतर भाजपचा बिनविरोध विजय झाला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपचे खातेही उघडले आहे. मुकेश दलाल येथून भाजपचे उमेदवार आहेत गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाने म्हणजेच भाजपाने लोकसभा निवडणुकीत विजयाचे खाते उघडले आहे. सूरतची जागा भाजपाने बिनविरोध जिंकत आपल्या खिशात टाकली आहे.सुरतमध्ये भाजपाचे उमेदवार मुकेश दलाल यांचा खासदार होण्याचा मार्ग मोकळा झाला असून ते बिनविरोध निवडणून आले आहेत. सूरत येथील काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांचा अर्ज रद्द झाल्याने समीकरणे बदलली होती. तर बसपाचे उमेदवार प्यारे लाल भारती यांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आठही उमेदवारांनी आपले उमेदवार अर्ज मागे घेतले. त्यामुळे भाजपाचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली.

No comments