इयत्ता पहिली प्रवेश पात्र विद्यार्थी तसेच पालक यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ३ शिरपूर येथे शाळा पूर्व...
इयत्ता पहिली प्रवेश पात्र विद्यार्थी तसेच पालक यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले
नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ३ शिरपूर येथे शाळा पूर्वतयारी मेळावा क्र.१ उत्साहात संपन्न
शिरपूर प्रतिनिधी
(संपादक: हेमकांत गायकवाड)
आज दि.२२/०४/२०२४-सोमवार रोजी नगर परिषद प्राथमिक शाळा क्रं.३ शिरपूर येथे शाळापूर्व तयारी मेळावा क्रं.१ आयोजित करण्यात आला.सदर मेळावा शि.व.न.प.मुख्याधिकारी प्रशांत सरोदे साहेब,शिरपूर विभागीय अधिकारी शरद मंडलिक,शिरपूर पंचायत समिती न.प.केंद्रप्रमुख अनिल बाविस्कर,शिक्षण विभाग प्रमुख न.प.मोहन चौधरी आबासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.सर्वप्रथम शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय विकास शिरसाठ यांच्या हस्ते फित कापून मेळाव्याचे शुभारंभ करण्यात आला.त्यानंतर मंचावर उपस्थित शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व प्रतिष्ठित मान्यवर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.त्यानंतर इयत्ता पहिली प्रवेश पात्र विद्यार्थी तसेच पालक यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. त्यानंतर शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक, श्री पावरा सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून मेळाव्याचे उद्दिष्ट साध्य केले.यानंतर प्रत्यक्ष मेळाव्याला सुरुवात झाली.वर्गामध्ये सात स्टॉल लावण्यात आले होते.प्रत्येक स्टॉलवर प्रत्येक विद्यार्थ्याचे काटेकोरपणे विविध कृतीच्या माध्यमातून मूल्यमापन करण्यात आले व विकास कार्ड यावर नोंदी करून शाळेतले पहिले पाऊल पुस्तक विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आनंदमय वातावरणात सहभाग घेऊन उदंड प्रतिसाद दिला .सर्वात महत्त्वाचे म्हणजे सेल्फी पॉइंट आकर्षण बिंदू ठरला. मेळाव्याचे आभार प्रदर्शन व सूत्रसंचालन श्री इंगोले सर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
No comments