विदगाव येथे अशक्तपणा असल्याने चक्कर येवुन पडल्याने अनोळखी इसमाचा सिव्हील हॉस्पीटल जळगाव येथे उपचार सुरु असतांना मृत्यू प्रतिनिधी जळगाव (स...
विदगाव येथे अशक्तपणा असल्याने चक्कर येवुन पडल्याने अनोळखी इसमाचा
सिव्हील हॉस्पीटल जळगाव येथे उपचार सुरु असतांना मृत्यू
प्रतिनिधी जळगाव
(संपादक: हेमकांत गायकवाड)
विदगाव येथील श्रीराम मंदीरा जवळ भिक मागीत असतांना उपासमारी मुळे व अशक्तपणा असल्याने चक्कर येवुन पडल्याने अनोळखी पुरुषास विदगाव येथिल ग्रामस्थांना आजारी बेवारस स्थितीत मिळुन आल्याने त्यास १०८ ॲम्ब्युलन्सने उपचारा करीता सिव्हील हॉस्पीटल जळगाव या ठिकाणी दि. २३/०३/२०२४ रोजी दाखल केले होते सदर ठिकाणी त्याचेवर उपचार सुरु असतांना तो दिनांक ०९/०४/२०२४ रोजी सकाळी १०:०० वाजता मयत झाला आहे. तरी सदरील इसमास जळगाव तालुका पो.स्टे. अकस्मात मृत्यु रजी. नं. ३२/२०२४, Crpc-१७४ मधील मयत अनोळखी पुरुषाचे ओळख पटविणे आव्हान करण्यात आले आहे
त्याचे राहणीमाना वरुन तो भिकारी असुन त्याचे वर्णन खालील प्रमाणे
मयताचे वर्णन एक अनोळखी पुरुष अंदाजे ५२ वर्ष वयोगटाचा रंगाने गोरा सावळा, उंची-५ फुट शरीराने सडपातळ, डोक्यावरील केस पांढरे, व दाढी पांढरी बारीक पांढरी मिशी असलेला, चेहरा लांबट दात पडलेले
सदर अनोळखी मयत इसमचे कुणी ओळखत असल्यास खालील नंबर वर संपर्क साधावा
संपर्क क्रमांक- जळगाव तालुका पोलीस स्टेशन- 0257 / 2253002


No comments