चोपडा नगरपरिषदेने हाती घेतली प्लॉस्टिक बंदी जप्तीची मोहिम दि. २२/०४/२०२४ ते दि. २५/०४/२०२४ पर्यंत ९ दुकानदारांकडून १६०००/- रु दंड आकारण्या...
चोपडा नगरपरिषदेने हाती घेतली प्लॉस्टिक बंदी जप्तीची मोहिम
दि. २२/०४/२०२४ ते दि. २५/०४/२०२४ पर्यंत ९ दुकानदारांकडून १६०००/- रु दंड आकारण्यात आलेला असून जवळपास ४० किलो सिंगल युज प्लॅस्टिक जप्त केले
चोपडा प्रतिनिधी
(संपादक:हेमकांत गायकवाड)
आज चोपडा शहरात सिंगल युज प्लॅस्टिकसह पॉलिस्टीरीन आणि विस्तारीत पॉलिस्टीरीनचे उत्पादन, आयात, साठा वितरण, विक्री आणि वापर यावर संपूर्णपणे बंदी घालण्यात आली याकामी चोपडा नगरपरिषद यांचे कडून प्लॅस्टिक विरोधी पथकाची नियुक्ती करण्यात आली असून याबाबत अधिक माहिती अशी की
केंद्र शासनाने १ जुलै २०२२ पासून सिंगल युज प्लॅस्टिकसह पॉलिस्टीरीन आणि विस्तारीत पॉलिस्टीरीनचे उत्पादन, आयात, साठा वितरण, विक्री आणि वापर यावर संपूर्ण बंदी घातली आहे या अनुषंगाने चोपडा नगरपरिषदेने प्लॉस्टिक बंदी जप्तीची मोहिम हाती घेतली आहे. दि. २२/०४/२०२४ ते दि. २५/०४/२०२४ पर्यंत ९ दुकानदारांकडून १६०००/- रु दंड आकारण्यात आलेला असून जवळपास ४० किलो सिंगल युज प्लॅस्टिक जप्त करण्यात आले असून या
प्लॅस्टिक विरोधी पथकाने शहरातील अमर प्लॉस्टिक, गुरु खेतेश्वर स्विटस, श्रध्दा जनरल स्टोअर्स, संदीप मौर्य, प्रकाश चौधरी, तरोडे किराणा, बिकानेर स्विटस, प्रिया बेकरी, या दुकानातून बंदी असलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, चमचे, ग्लास, डिश, असे एकुण सुमारे ४० किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आलेली असुन सदर कार्यवाही मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. प्लॅस्टिक जप्ती पथकात अ. स्वच्छता निरीक्षक व्हि. के. पाटील, शहर समन्वय अभिषेक वाणी व मुकादम सुनिल बाविस्कर, ज्ञानेश्वर कोळी, निलेश कोळी, किशोर पवार, रिंकू पवार, राहुल सैंदाणे, लखन पवार, इत्यादीचा समावेश आहे. सदरील पथकाव्दारे यापुढे संपूर्ण चोपडा शहरात प्लॅस्टिक बंदी मोहिम तीव्र करण्यात येणार असून शहरातील होलसेल विक्रेते, दुकानदार, हॉटेल मालक व सर्व आस्थापनानी प्लॅस्टिकचा वापर टाळावा व नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन नगरपरिषद चोपडा मार्फत करण्यात आले आहे.
No comments