adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

ग.स.संस्थेतर्फे राजमाता जिजाऊ कन्यादान योजनेचा धनादेश वितरित..

 ग.स.संस्थेतर्फे राजमाता जिजाऊ कन्यादान योजनेचा धनादेश वितरित.. जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी (ग.स.) संस्थेतर्फे सभासदांच्या मु...

 ग.स.संस्थेतर्फे राजमाता जिजाऊ कन्यादान योजनेचा धनादेश वितरित..


जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी (ग.स.) संस्थेतर्फे सभासदांच्या मुलींना राजमाता जिजाऊ कन्यादान योजनेअंतर्गत रू.५०००/- मात्रचा धनादेश लग्नाच्या दिवशी देण्यात येतो

चोपडा (प्रतिनिधी):-

(संपादक : हेमकांत गायकवाड)

जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी (ग.स.) संस्थेचे विद्यमान अध्यक्ष उदय पाटील व सर्व संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सभासदांच्या मुलींना राजमाता जिजाऊ कन्यादान योजनेअंतर्गत रू.५०००/- मात्रचा धनादेश लग्नाच्या दिवशी देण्यात येत असतो. त्यानुसार तालुक्यातील कोळंबा येथील श्री गुरुदेव माध्यमिक विद्यालयाचे कर्मचारी विलास शंकर बाविस्कर यांची सुकन्या चि.सौ.कां.कावेरी (पूजा) हिच्या लग्नप्रसंगी संस्थेचे स्थानिक संचालक मंगेश भोईटे, योगेश सनेर यांच्या प्रमुख उपस्थितीत तज्ञशिक्षक संजय पाटील यांच्या शुभहस्ते रू. पाच हजार मात्रचा धनादेश वितरित आला. याप्रसंगी चोपडा शाखेचे शाखाधिकारी जगन्नाथ बाविस्कर, निमगव्हाणचे माजी उपसरपंच अनिल बाविस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.

No comments