चोपडयाचा ज्ञानेंद्र पाटील एन एम एम एस गुणवत्ता यादीत ज्ञानेंद्र पाटील ज्ञानेंद्र प्रवीण पाटील याने २०२३ मध्ये झालेल्या एन एम एम एस परीक्...
चोपडयाचा ज्ञानेंद्र पाटील एन एम एम एस गुणवत्ता यादीत
ज्ञानेंद्र प्रवीण पाटील याने २०२३ मध्ये झालेल्या एन एम एम एस परीक्षा कोकमठाण येथील आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल शाळेत परीक्षा दिली होती.
चोपडा प्रतिनिधी
(संपादक: हेमकांत गायकवाड)
चोपडा शहरातील बोरोले नगर -१ येथील रहिवासी ज्ञानेंद्र प्रवीण पाटील याने २०२३ मध्ये झालेल्या एन एम एम एस परीक्षा कोकमठाण येथील आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल शाळेत परीक्षा दिली होती.या परीक्षेचा निकाल दि १२ रोजी लागला असून त्याने या परीक्षेत १८० पैकी १२१ मार्कस मिळवून तो गुणवत्ता यादीत आलेला आहे.
ज्ञानेंद्र पाटील हा गुणवत्ता यादीत आल्याने त्याला पुढील चार वर्षे शिष्यवृत्ती मिळणार आहे.त्याच्या या यशाबद्दल आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी,शाळेचे प्राचार्य निरंजन डांगे,वर्गशिक्षक दिपाली भोसले,रेक्टर पंकज वाघ यांनी त्याचे कौतुक केले आहे.
ज्ञानेंद्र पाटील हा जेष्ठ कवी तथा पत्रकार रमेश जे पाटील ,सूतगिरणी संचालिका कमलबाई पाटील यांचा नातू व जळगाव जिल्हा दोडे गुर्जर संस्थानचे विश्वस्त प्रवीण पाटील यांचा मुलगा आहे.

No comments