वर्डी ता.चोपडा येथे दि.२ मे पासून भव्य मोफत वारकरी बालसंस्कार शिबिराचे आयोजन आपल्या पाल्यांना या बालसंस्कार शिबिरात पाठवून त्यांची संस्कार...
वर्डी ता.चोपडा येथे दि.२ मे पासून भव्य मोफत वारकरी बालसंस्कार शिबिराचे आयोजन
प्रतिनिधी चोपडा
(संपादक: हेमकांत गायकवाड)
समर्थ सद्गुरु सुखनाथ बाबा यांच्या नगरीत वर्डी ता.चोपडा येथे दि.२ मे ते ११ मेदरम्यान सद्गुरू संत तानाजी महाराज प्रसादिक भव्य मोफत वारकरी बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून,या बालसंस्कार शिबिरात मुलांच्या उन्हाळी सुट्टीत त्यांना सुसंस्कारांचे बीजारोपण व्हावे,तसेच आगामी पिढी अध्यात्मिक व सुसंस्कारित व्हावे या पवित्र उद्देशाने सद्गुरू संत तानाजी महाराज यांचे वंशज महंत प्रा. हभप सुशील जी महाराज विटनेरकर यांच्या मार्गदर्शनाने या सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात येत असून,यावर्षी या शिबिराचे तिसरे वर्ष आहे,हे शिबिर दरवर्षी फिरत्या नारळाच्या पद्धतीने नवनवीन गावांना होत असते,त्यासाठी २०२९ पर्यंत या फिरत्या बालसंस्कार शिबिराचे नारळ स्वीकारले गेले आहे.
तरी सर्व परिसरातील भाविकांनी आपल्या पाल्यांना या बालसंस्कार शिबिरात पाठवून त्यांची संस्कारांची शिदोरी बळकट करावी,दररोज होणाऱ्या हरिकीर्तनाचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा असे आव्हाहन संयोजक प.पु. भैय्या दादा, महंत प्रा.सुशील महाराज विटनेरकर,आणि आयोजक ग्रामस्थांनी केले आहे
No comments