Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मलेरिया विरुदध जगाच्या संरक्षणासाठी गतीमान करुया लढा मलेरियाला हरविण्यासाठी

  जागतिक हिवताप  दिन २५ एप्रिल २०२4             मलेरिया विरुदध जगाच्या संरक्षणासाठी गतीमान करुया लढा  मलेरियाला हरविण्यासाठी  प्रतिनिधी चोपड...

 जागतिक हिवताप  दिन २५ एप्रिल २०२4

            मलेरिया विरुदध जगाच्या संरक्षणासाठी गतीमान करुया लढा  मलेरियाला हरविण्यासाठी 

प्रतिनिधी चोपडा

(संपादक : हेमकांत गायकवाड)

आज दिनाक 25‍  एप्रिल  2024 रोजी जागतिक  हिवताप दिन साजरा करण्यात आला मा. डॉ. सचिन भायेकर जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव तसेच डॉ. तुषार देशमुख जिल्हा हिवताप अधिकारी जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली मा.डॉ. रमेश धापते सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी जि. प. जळगाव यांच्या  हस्ते हिवताप रॅलीला हिरवी झेंडी दाखवुन सुरवात करण्यात आली, जिल्हा परिषद जळगाव येथुन रॅली  सुरवात  करण्यात आली रॅली टॉवर चौक , महानगरपालीका , कोर्ट चौक  नवीन बस स्टॅन्ड सिव्हील हॉस्पीटल पांडे चौक येथुन जिल्हा हिवताप कार्यालय येथे सांगता करण्यात आली. रॅली मध्ये हिवताप कार्यालयातुन  श्री. महेंद्र पाटील सहा. जिल्हा हिवताप अधिकारी जळगाव श्री.ङि पी. बाविस्कर, आरोग्य पर्य, श्री डी सी.सपकाळे    आरोग्य निरीक्षक श्री.किसन नगराळे , आकाश सपकाळे .पंकज तायडे . आरोग्य निरीक्षक तसेच  आरोग्य सेवक कर्मचारी वृध्द तसेच म.न.पा आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते. 

तसेच  रॅली दरम्यान हस्तपत्रिका वाटप करण्यात आल्या, व शाळेत हिवताप विषयक विदयार्थी यांनाहिवताप आजारा विषयी संपुर्ण ‍ माहिती सांगण्यात आली , बस स्टॅन्ड मध्ये हिवतापाबाबत साहित्य प्रदर्शन स्टॉल लावण्यात आले होते.  तसेच हिवताप विषयी जनतेमध्ये जनजागृती  निर्माण  होऊन  प्रतिरोध  उपाय योजनांच्या अंमलबजावणीमध्ये  त्यांचा सक्रिय सहभाग प्राप्त करुन घेण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्षी विविध  उपक्रमांव्दारे  जनतेपर्यत ‍ माहीती  पोहचविणेचा  प्रयत्न करणे  हा मोहीमेचा  प्रमुख उददेश आहे

No comments