adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रेशन मिळणेकरीता ऑनलाईन नोंदणी करून देण्याचे मोबदल्यात मागितली लाच

  १५ गरीब व गरजु कुटुंबांचे अंत्योदय योजना व पिवळे रेशनकार्ड ची रेशन मिळणेकरीता ऑनलाईन नोंदणी करून देण्याचे मोबदल्यात मागितली लाच  आलोसे रवि...

 १५ गरीब व गरजु कुटुंबांचे अंत्योदय योजना व पिवळे रेशनकार्ड ची रेशन मिळणेकरीता ऑनलाईन नोंदणी करून देण्याचे मोबदल्यात मागितली लाच 


आलोसे रविंद्र बळीराम दहीते, अव्वल कारकुन, धान्य वितरण अधिकारी कार्यालय मालेगाव, जि. नाशिक यांनी २२०००/- रुपये लाचेची रक्कम स्विकारल्याने त्यांचे विरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये कारवाई करण्यात आली 

मालेगाव  प्रतिनिधी

(संपादक:हेमकांत गायकवाड)

याबाबत अधिक माहिती अशी की यातील तक्रारदार हे सामाजिक कार्य करीत असुन यातील आलोसे रविंद्र बळीराम दहीते. हे अव्वल कारकून धान्य वितरण अधिकारी  कार्यालय मालेगाव, जि. नाशिक येथे कार्यरत असुन त्यांचे यांनी तक्रारदार यांचेकडे  दि. ०४/०४/२०२४ रोजी मालेगाव शहर परीसरातील दिलेल्या १५ गरीब व गरजु कुटुंबांचे अंत्योदय योजना व पिवळे रेशनकार्ड ची रेशन मिळणेकरीता ऑनलाईन नोंदणी करून देण्याचे मोबदल्यात १५००/- रू प्रत्येकी याप्रमाणे एकूण २२,५००/- रूपयांची लाचेची मागणी केल्याने तकारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक कार्यालयात यांचेकडे तक्रार दिली होती तरी सदर तक्रारीवरुन ला.प्र.वि. नाशिक पथकाने पडताळणी करून सापळा आयोजित करण्यात आला होता सापळा कारवाई दरम्यान आलोसे रविंद्र बळीराम दहीते, अव्वल कारकून धान्य वितरण अधिकारी कार्यालय मालेगाव, जि. नाशिक यांनी तक्रारदार यांचे कडे २२५००/- रुपये लाचेची मागणी करून दि.०८.०४.२०२४ रोजी मागणी केलेल्या लाच रक्कमेपैकी २२,०००/- लाचेची रक्कम स्विकारल्याने त्यांना पकडण्यात आले असुन त्यांचेविरुद्ध मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशन नाशिक ग्रामिण गु.र.नं. ८३/२०२४ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ प्रमाणे. दि.०९.०४.२०२४ गेजी गुन्हा नोंदविण्यान आला आहे.

लाचलुचपत विभागातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र, नाशिक येथे संपर्क करावा.

संपर्क पत्ता

ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र, नाशिक

संकेतस्थळ

acbmaharashtra.gov.in

ई-मेल

spachnashik@mahapolice.gov.in

ऑनलाईन तकार

acbmaharashtra.net

टोल फ्री क्रमांक

१०६४

दुरध्वनी क्रमांक

०२५३-२५७५६२८, २५७८२३०







No comments