प्रहारच्या वचकाने रखडलेले दिव्यांग पाच टक्के निधी लोनवडी ग्रामपंचायतीने केला वस्तू स्वरूपात वाटप दिव्यांगाना राहिलेला पाच टक्के निधी देता!...
प्रहारच्या वचकाने रखडलेले दिव्यांग पाच टक्के निधी लोनवडी ग्रामपंचायतीने केला वस्तू स्वरूपात वाटप
दिव्यांगाना राहिलेला पाच टक्के निधी देता! नाही तर आता दिव्यांग वरिष्ठांकडे जाता या प्रहार स्टाईल वाक्याने ग्रामपंचायतीची साखर झोप उडाली
अमोल बावस्कार (प्रतिनिधी मलकापूर)
(संपादक: हेमकांत गायकवाड)
मलकापूर-:
ग्रामपंचायतीच्या एकूण उत्पन्नातील पाच टक्के निधी हा दिव्यांग बांधवांना वाटप करण्यात यावे अशा सूचना दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम १०१६ मधील कलम ३७ नुसार शासन निर्णयानुसार व ग्राम विकास विभागाने जारी केलेल्या असून सुद्धा मागील निधी वाटप करून त्याला एक वर्ष उलटून ३ महिने जास्त झाले
तरी लोनवडी ग्रामपंचायत ही मागील गेल्या २ महिन्या पासून दिव्यांग बांधवांना तारीख वर तारीख देऊन आश्वासन देत होते हा सर्व प्रकार दिव्यांग बांधवांनी प्रहार सेवक युवा तालुका प्रमुख अमोल बावस्कार यांना सांगितल्यानंतर त्यांनी संपर्क द्वारे सरपंचा,सरपंच पती,उपसरपंच,सदस्य यांना विचारणी केली असता त्यांनी मीटिंग घेऊ,ऑर्डर दिली,कोणी विषयाकडे लक्ष नाही देत,दोन दिवसात देतो असे उडवा उडविचे उत्तर देऊन निधी डावलण्याचा प्रयत्न केला यांच्या सर्व बाबी लक्षात घेऊन यांना धारेवर आण्यासाठी शेवटी प्रहार स्टाईलने ग्रामपंचायतीला एकच वाक्य सांगण्यात आले की, दिव्यांगांना राहिलेला पाच टक्के निधी देता ! नाही तर आता दिव्यांग वरिष्ठांकडे जाता या वाक्याने ग्रामपंचायतीची साखर झोप उडाली व त्यांनी दुसऱ्याच दिवशी दिव्यांग बांधवांना बोलून पाच टक्के निधी वस्तू स्वरूपात वाटप केली.यावेळी दिव्यांग योगेश पाटील,गजानन वाघ,नंदु बऱ्हाटे,चंद्रकांत बावस्कार,आशा बावस्कार,सुलभा सुरडकर, प्रमिला बावस्कार व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.






No comments