निवडणूक कर्मचाऱ्यांना चोपडा येथे प्रशिक्षण निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या एकूण १८२३ कर्मचारीन पैकी १७०५ क्षेत्रीय अधिकारी व कर्मचा...
निवडणूक कर्मचाऱ्यांना चोपडा येथे प्रशिक्षण
निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या एकूण १८२३ कर्मचारीन पैकी १७०५ क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यावेळी प्रशिक्षण घेतले.
चोपडा प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पार पडावी यासाठी निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रथम प्रशिक्षण दिनांक ७ एप्रिल रोजी महात्मा गांधी शिक्षण प्रसारक मंडळाच्या डॉ. सुरेश पाटील महाविद्यालयात दोन सत्रात पार पडले.
निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या एकूण १८२३ कर्मचारीन पैकी १७०५ क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यावेळी प्रशिक्षण घेतले.
सदर प्रशिक्षणास सहा. निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे, अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब थोरात, निवडणूक नायब तहसीलदार सचिन बांबळे आदींच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. प्रशिक्षण वर्गात अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी भेट दिली. केंद्रप्रमुख तथा मास्टर ट्रेनर नरेंद्र सोनवणे यांनी सकाळ ८ ते ११ च्या सत्रात पिपिटी द्वारे सविस्तर माहिती दिली. ११ ते दुपारी १ वाजे पर्यंत प्रत्येकाने इव्हीयम मशीन व बॅलेट युनिट हाताळणी करण्यात आली. नंतर प्रश्न उत्तरे घेण्यात आले. सराव प्रश्नसंच सोडविण्यात आले. दुपारच्या सत्रात तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनीही कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. यावेळी प्रशिक्षणानंतर सर्व नियुक्त कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीन हाताळणी प्रात्यक्षिक करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली
निवडणुकीत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या कडून पोस्टल बॅलेट नमुन्यात अर्ज घेण्यात आले. प्रशिक्षण यशस्वीतेसाठी सर्वच क्षेत्रीय अधिकारी, झोनल अधिकारी, नोडल अधिकारी, नियुक्त कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.





No comments