राजाभाऊ वाजेंना अधिकाधिक मताधिक्याने निवडून आणूया आ.हिरामणजी ख...
राजाभाऊ वाजेंना अधिकाधिक मताधिक्याने निवडून आणूया आ.हिरामणजी खोसकर
इगतपुरी मतदार संघातील महा विकास आघाडीची बैठक मा. हिरामणजी खोसकर साहेब व मा राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शन ने संपन्न
राजेंद्र सोनवणे (विशेष प्रतिनिधी)
(संपादक : हेमकांत गायकवाड)
इगतपुरी मतदार संघातील महाविकास आघाडीच्या बैठकीत माननीय खोसकर साहेब आमदार इगतपुरी त्र्यंबक मतदारसंघ यांनी आपल्या मतदारसंघातील इगतपुरी तालुक्यातील महाविकास आघाडीचे सर्व आजी- माजी आमदार पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य ग्रामपंचायत सरपंच सदस्य काँग्रेस शिवसेना उठाबा गट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट तालुकाध्यक्ष पक्षाचे कार्यकर्ते व महिलावर्ग यावेळी उपस्थित होते.
तरी आपण आघाडीतील पक्ष पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी व महिला वर्गांनी जर का आपल्याला आपल्या आदिवासी भागातील चांगला विकास जर पाहिजे असेल. तर माननीय वाजे भाऊ यांना चांगल्या मतधिकांनी नाशिक लोकसभेच्या मतदार संघातून चांगल्या लीडने निवडून . गल्लीतून दिल्लीला पाठवायचे आहे. असे मी आपल्याला सर्वानुमते सुचित करीत आहे.
माननीय भाऊ यांना केलेल सहकार्य भाऊ कधीही विसरणार नाहीत आपलं कुठलंही कामामध्ये अडचण आली का माझ्या मार्फत आपण भाऊंन कडे जाऊन ती आपली समस्या सुटेल अशी मला पूर्ण खात्री आहे. माझा व भाऊ साहेबांचा खूप पहिल्यापासून संबंध चांगला आहे त्यामुळे भाऊ आपली कोणत्याही अडीअडचणीचा कंटाळा करणार नाहीत अशी मला त्यांची खात्री आहे. म्हणून माझे आपल्याला नम्रपणे विनंती आहे की यावेळी माननीय दादांना चान्स देऊन चांगल्या मताधिकांनी निवडून द्यावी ही माझी सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती , सूचना आहे असे माननीय खोसकर साहेबांनी माननीय राजाभाऊ वाजे यांच्या निवडीबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या यावेळी बहूसंख्य समुदायाने बैठकीला हजेरी लावली होती आम्ही आपल्याला चांगल्या मताधिकांनी निवडून दिल्लीला पाठवू असे लोकांनी विश्वास दाखवला यावेळी माननीय खोसकर साहेब व माननीय भाऊ वाजे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.




No comments