मा. मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांच्या दालनात शांततेच्या मार्गाने ठिय्या आंदोलनाची मागितली परवानगी शासकीय कामकाजाच्या वेळेत मा. मुख्य कार्य...
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांच्या दालनात शांततेच्या मार्गाने ठिय्या आंदोलनाची मागितली परवानगी
शासकीय कामकाजाच्या वेळेत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांच्या दालनात शांततेच्या मार्गाने ठिय्या आंदोलनाची मागितली परवानगी
प्रतिनिधी चोपडा
(संपादक: हेमकांत गायकवाड)
माहिती देण्यास टाळाटाळ करून खरेदी प्रक्रिया व मनुष्यबळ भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार तसेच गैरव्यवहार लपवत असल्याने डॉ. सचिन भायेकर जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद जळगाव हे माहिती उपलब्ध करुन देत नाही तो पर्यत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात दि. १५/०४/२०२४ पासून ठिय्या आंदोलन करण्याची आंदोलनकर्ताः श्री. दिनेश कडू भोळे, सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता तथा अभ्यासक शासकीय यंत्रणा व योजना आणि विशेष अभ्यासक शासकीय आरोग्य यंत्रणा यांनी आयुश प्रसाद साहेब, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष भ्रष्टाचार निर्मुलन समिती जळगांव.यांचे मागितली कडे परवानगी
याबाबत अधिक माहिती अशी की ठिय्या आंदोलनाबाबत पूर्वसूचना देत आहे की, गेल्या वर्षभरापासून जिल्हा आरोग्य अधिकारी विभागात वेगवेगळ्या विषयाबाबत संबंधित यंत्रणेला माहिती मिळवण्यासाठी रितसर माहिती अधिकारात अर्ज तसे अपील केले असता तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांना मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकीत साहेबांनी वेळोवेळी सुचित करुनही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर हे मनमानी करून माहिती देण्यासाठी टाळटाळ करीत असल्याचे निदर्शनास आलेले आहे.
सबंधित माहिती ही राष्ट्रीय आरोग्य अभियान या यंत्रणेशी निगडित असून त्यात करोडो रुपयांचा निधी शासनाकडून जिल्ह्यातील आरोग्य विभागावर खर्च करण्यासाठी दिलेला असतो. यांत सर्व कर्मचारी हे कंत्राटी नियुक्ती वर असल्याने नियंत्रण अधिकारी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी यांच्या माध्यमातून खर्च केला जातो.
सबंधित ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांधकामावरील खर्च, व साहित्य खरेदी साठी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर पणे निधी खर्च झाल्याने व चुकीच्या पद्धतीने मनुष्यबळाची भरती केल्याने संबंधित सर्व अधिकारी कर्मचारी यांचा भ्रष्टाचार, गैरव्यवहार उघड होण्याची यंत्रणेला खात्री झाल्याने माहिती देण्यास टाळटाळ करीत असल्याचे दिसून येत असल्याने सदर आंदोलन करण्यास यंत्रणेने भाग पाडले आहे.
तरी, माझी प्रशासनाला विनंती आहे की, जो पर्यत माझ्या सर्व अर्जांची माहिती मला परीपूर्ण मिळत नाही तो पर्यंत मी दि. १५/०४/२०२४, वेळ सकाळी १०:०० पासून शासकीय कामकाजाच्या वेळेत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांच्या दालनात शांततेच्या मार्गाने ठिय्या आंदोलन करणार असल्याचे याद्वारे कळवित असून मला परवानगी मिळावी.असे त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे


No comments