adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दररोज टँकरच्या साहाय्याने पाणी भरून पशु,पक्षी व वनप्राण्यांची पाण्याची व्यवस्था केली जात आहे

दररोज टँकरच्या साहाय्याने पाणी भरून पशु,पक्षी व वनप्राण्यांची पाण्याची व्यवस्था करण्यात येतेय जंगलातील जिवंत पाण्याचे स्त्रोत नदी नाले आटू ल...

दररोज टँकरच्या साहाय्याने पाणी भरून पशु,पक्षी व वनप्राण्यांची पाण्याची व्यवस्था करण्यात येतेय


जंगलातील जिवंत पाण्याचे स्त्रोत नदी नाले आटू लागल्याने वन्यजीवांसाठी  कृत्रिम वाटरहोल बनवून त्या वाटरहोल मध्ये दररोज टँकरच्या साहाय्याने पाणी भरून पशु,पक्षी व वनप्राण्यांची पाण्याची व्यवस्था केली जात आहे 


विश्राम तेले प्रतिनिधी चोपडा                   (संपादक : हेमकांत गायकवाड)

सध्या उन्हाळा पारा हा ४२ डिग्री सेल्सीअसच्याही पुढे गेला आहे.दर वर्षी मोठ्या प्रमाणावर होणारी  वृक्षतोड,पर्यावरणाचा होणारा र्हास यामुळे दिवसेंदिवस तापमान हे वाढतच चाललय .त्यातच भुगर्भातून मोठ्या प्रमाणात होणारा उपसा त्यामुळे पाण्याची पातळी खालावत चालली आहे.परीणाम नदी,नाले,जंगलातील जिवंत पाण्याचे स्त्रोत आटू लागली आहेत.


जे आहेत ते पण तापमानात बार्पीभवनामुळे टिकत नाहीत.यात सर्वात जास्त फटका जर कुणाला बसत असेल तर तो पशु ,पक्षी व मुक्या प्राण्यांना रखरखते ऊन त्यात पाण्याचे दुर्भक्ष्य यामुळे अनेक प्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे व शेतीकडे आपला मोर्चा वळवतात.पण ईकडेही शिकारी व गावकुत्र्यांचा वावर असतोच.म्हणून  वन नष्ट करून त्यांचा त्यांचा सुरक्षित निवारा तर आपण आधीच हिरावून घेतला आहे.


पण किमान पाण्याची सोय व्हावी म्हणून वन विभाग व काही निसर्गप्रेमी पाण्याच्या ठिकाणी दगडांच्या साहाय्याने वाटरहोलची निर्मिती करत असतात.पण एप्रिल व मे महिण्यात ते आटतात.म्हणून कृत्रिम वाटरहोल बनवून त्यात टँकरने पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी अनेक निसर्ग प्रेमींकडून होत असतांना यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक श्री जमिर शेख साहेब यांनीही वन विभागात सिमेंटचे क्रुतीम वाटरहोल बनवलेत व प्राण्यांसाठी व पक्षांसाठी यावल वन विभागातील वैजापूर,देवझरी,चोपडा रेंजमध्ये सहाय्यक उपवन संरक्षक श्री प्रथमेश हडपे जे स्वत: एक निसर्ग कवी आहेत.



यांच्या मार्फत व वनक्षेत्रपाल समाधान सोनवणे वैजापूर,वनक्षेत्रपाल बी.के थोरात चोपडा व वनक्षेत्रपाल साबळे यांच्या देखरेखीखाली कृत्रिम वाटरहोल बनवलेत व त्या वाटरहोल मध्ये दररोज टँकरच्या साहाय्याने पाणी भरून पशु,पक्षी व वनप्राण्यांची पाण्याची व्यवस्था करत आहेत.त्यामुळे प्राणी पाण्यासाठी जीवधोक्यात घालून शेती शिवारात व गावाकडे न येता आपल्या नैसर्गिक आधीवासातच राहाणे पसंत करत आहेत.

No comments