एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापूर्वीच देशातील १५ राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा कहर पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमधील गंगा किनारी भाग, छत्त...
एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापूर्वीच देशातील १५ राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा कहर
पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमधील गंगा किनारी भाग, छत्तीसगड, महाराष्ट्र, बिहार आणि ओडिशा यासारख्या अनेक राज्यांमध्ये कमाल पारा ४२-४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला
नवी दिल्ली वृत्तसंस्था
(संपादक : हेमकांत गायकवाड)
एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापूर्वीच देशातील १५ राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा कहर पाहायला मिळत आहे. तापमान ४५ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार पाच दिवस परिस्थिती गंभीर राहील. पूर्व उत्तर प्रदेशापासून बंगाल, छत्तीसगड आणि महाराष्ट्रापर्यंत परिस्थिती वाईट आहे. तापमानात आणखी २ ते ३ अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानेही पाण्याची पातळी घसरल्याबाबत अलर्ट जारी केला आहे. सकाळी १० वाजेपासून
दुपारप्रमाणे उकाडा जाणवू लागला आहे. पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमधील गंगा किनारी भाग, छत्तीसगड, महाराष्ट्र, बिहार आणि ओडिशा यासारख्या अनेक राज्यांमध्ये कमाल पारा ४२-४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार येत्या पाच दिवसांत आणखी उष्णतेचा सामना करावा लागणार असून तापमानात केवळ २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होऊ शकते.
हे भाग तीव्र उष्णतेच्या कचाट्यात आहेत
शनिवारी पुढील पाच दिवस उष्णतेची लाट आणि उष्णतेचा अंदाज जारी केला आणि सांगितले की, पूर्व उत्तर प्रदेश, गंगा किनारी पश्चिम बंगाल, उत्तर रायलसीमा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ, मराठवाडा, महाराष्ट्राचा काही भाग, तेलंगणा, ओडिशामध्ये कमाल तापमान ४२ ते ४४ अंश सेल्सिअस राहील. झारखंड, पूर्व मध्य प्रदेश, पूर्व उत्तरेकडील काही भागांमध्ये तापमान ४०-४२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. या काळात बंगालमधील गंगेच्या किनारी भागात उष्णतेची तीव्र लाट येऊ शकते. कर्नाटक, तामिळनाडू, पुद्दुचेरी, उत्तराखंड, विदर्भ आणि पश्चिम मध्य प्रदेशच्या अंतर्गत भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा २-३अंशांनी जास्त नोंदवले गेले.
No comments