निधन वार्ता रामजी भावला बारेला रामजी पाडा अडावद रामजी बारेला यांनी साधारण पन्नास वर्षांपू्वी माजी सरपंच रतीलाल सुका रजकुळे यांच्या शेतात...
निधन वार्ता
रामजी भावला बारेला
रामजी पाडा अडावद
रामजी बारेला यांनी साधारण पन्नास वर्षांपू्वी माजी सरपंच रतीलाल सुका रजकुळे यांच्या शेतात आपल्या अनेक सहकाऱ्यांसोबत येवून एक पाडा वसविला त्याचे नाव लोकांनीच रामजी पाडा म्हणून ठेवले.
प्रतिनिधी चोपडा
(संपादक:हेमकांत गायकवाड)
येथील रामजी भावला बारेला (७०) यांचे दिनांक १२ रोजी सकाळी ६:३० वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली असा मोठा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा दिनांक १३ रोजी दुपारी १२ वाजता राहते घरापासून निघणार आहे. ते दिनेश बारेला यांचे वडील होत
रामजी बारेला यांनी साधारण पन्नास वर्षांपू्वी माजी सरपंच रतीलाल सुका रजकुळे यांच्या शेतात आपल्या अनेक सहकाऱ्यांसोबत येवून एक पाडा वसविला त्याचे नाव लोकांनीच रामजी पाडा म्हणून ठेवले. आज त्या पाड्याचे पंधराशे लोकवस्तीचे गावात रूपांतर झाले आहे . या पाड्यावर माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे व आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे, संजीव शिरसाठ आदिवासी समाज सेवक, भावनाताई माळी माजी लोकनियुक्त सरपंच अडआवद यांच्या सहकार्याने पन्नास घरकुले उभारून दिली. तसेच रस्ते, पाण्यासाठी दोन बोअरवेल तसेच पाण्याच्या टाकीचे काम सुरू आहे. आपल्या आदिवासी बांधवांना शासनाच्या विविध योजना मिळाव्यात यासाठी रामजी बरेला व त्यांची मुले अहोरात्र झटत असतात.
संपूर्ण पाड्यावर अबाल वृद्धांच्या हे सुखदुःखात नेहमी अग्रेसर राहणारे रामजी बारेला आज अनंतात विलीन झाले.परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चीर शांती देवो ही प्रार्थना.

No comments