Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे निवडणूक प्रशिक्षण संपन्न

  चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे निवडणूक प्रशिक्षण  चोपडा येथील नगर परिषदेच्या नाट्य गृहात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कर्तव्यासाठ...

 चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे निवडणूक प्रशिक्षण 


चोपडा येथील नगर परिषदेच्या नाट्य गृहात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

प्रतिनिधी चोपडा 

(संपादक:हेमकांत गायकवाड)

चोपडा येथील नगर परिषदेच्या नाट्य गृहात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न झाले. यावेळी अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी कर्मचाऱ्यांना निवडणुकीदरम्यान करावयाची कामे आणि जबाबदारी याबाबत यथोचित प्रशिक्षणदिले. यावेळी मतदारसंघातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लावणे, मतदान केंद्रांवरील पायाभूत सुविधांची उपलब्धता करणे मतदानाच्या दिवशी निर्धारित केलेले कामे पार पाडणे आर्दी बाबत कर्मचाऱ्यांना माहिती दण्यात आली. निवडणुकीसाठी नियुक्त मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी त्यांच्याकडून पोस्टल बॅलेट नमुन्यात अर्ज घेण्यात आले. प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी निवडणुकीच्या कर्तव्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी वृंदाने परिश्रम घेतले 



No comments