Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

NMMS च्या परीक्षेत महाराणा प्रताप विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

  NMMS च्या परीक्षेत महाराणा प्रताप विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश विद्यार्थ्यांनी शासनाची शिष्यवृत्ती प्राप्त करण्यात यश भुसावळ प्...

 NMMS च्या परीक्षेत महाराणा प्रताप विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश


विद्यार्थ्यांनी शासनाची शिष्यवृत्ती प्राप्त करण्यात यश

भुसावळ प्रतिनिधी

(संपादक: हेमकांत गायकवाड)

 दि.२४ :- भुसावळ येथील महाराणा प्रताप विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे एन .एम .एम .एस परीक्षा २०२४ मध्ये विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या परीक्षेत एस .सी संवर्गातून निखिल संजय मोरे हा विद्यार्थी २८ व्या रँक ने तसेच आदर्श बाबुलाल कोकणे ३१ व्या रँक ने व ओपन संवर्गातून आर्यन राजेंद्र वानखेडे ११८ व्या रँक ने प्रथमेश योगेश धनपाल १५० व्या रँक ने उत्तीर्ण होऊन या विद्यार्थ्यांनी शासनाची शिष्यवृत्ती मिळवलेली आहे.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे पालक माननीय श्री बापूसाहेब मांडे संस्था अध्यक्ष श्री सोनुभाऊ मांडे तसेच संस्थेच्या सचिव श्रीमती उषाताई पाटील, शाळेचे मुख्याध्यापक श्री सुरेश शिंदे पर्यवेक्षक श्री नारायण घोडके यांनी कौतुक केले या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन श्रीमती दिपाली पाटील मॅडम व सर्व शिक्षक वृंदांनी केले या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेने पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

No comments