Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याचा मोठा निर्णय

  सार्वजनिक बांधकाम विभागाने २००५ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई प्रत...

 सार्वजनिक बांधकाम विभागाने २००५ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.


मुंबई प्रतिनिधी

(संपादक: हेमकांत गायकवाड)

सार्वजनिक बांधकाम विभागाने २००५ नंतर शासकीय सेवेत रुजू असलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू  करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय सोमवारी काढण्यात आला  त्यानंतरच अधीक्षक अभियंता संवर्गातील शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली ज्यात ४ अधीक्षक अभियंत्यांचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या अनेक काळापासून शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी अशी मागणी होत होती. त्यानुसार राज्य सरकारने १ नोव्हेंबर २००५ रोजी निवड केलेल्या काही सरकारी कर्मचाऱ्यांना आणि शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे सर्वाधिकार आणि कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा ही मिळाला त्यानंतर आता बांधकाम विभागाने अधीक्षक अभियंता संवर्गातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याचा निर्णय घेतला असून बांधकाम विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार, १-२-२०२४ रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत दाखल झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू झाली आहे. तसेच, या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्रीय नागरी सेवा (निवृत्ती) नियम, १९७२ / २०२१ लागू करत एक वेळ पर्याय हा निर्णय घेण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे, बांधकाम विभागाच्या शासकीय नियंत्रणाखाली असलेल्या अधीक्षक अभियंता संवर्गातील कर्मचाऱ्यांचे अर्ज आणि विकल्प जमा झाले आहेत.दरम्यान, आता २-२-२०२४ नुसार विवरणपत्रातील नमुद अधिकाऱ्यांना जूनी पेन्शन योजना लागू असणार आहे. या कारणामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भविष्यनिर्वाह निधी खाते काढून जुने NPS खाते बंद करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. याबरोबर, नवीन खात्यांमध्ये नव्या योजनेनुसार रक्कम व्याजासह जमा करावी आणि ती रक्कम राज्य सरकारच्या निधीतून वळवावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

No comments