आचारसंहितेत विना परवाना हॉटेल ढाब्यांसह हायवेवर अवैध दारूची विक्री पोलिस प्रशासन, उत्पादन शुल्क अबकारी विभाग अनभिज्ञ रावेर प्रति...
आचारसंहितेत विना परवाना हॉटेल ढाब्यांसह हायवेवर अवैध दारूची विक्री
पोलिस प्रशासन, उत्पादन शुल्क अबकारी विभाग अनभिज्ञ
रावेर प्रतिनिधी/मुबारक तडवी
(संपादक: हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील अंकलेश्वर-बुर्हानपुर महामार्गावरील सावदा मोठा वाघोदा विवरा रावेर सह तालुक्यातील अंकलेश्वर बुर्रहानपुर महामार्गावर ढाबे, हॉटेल्स सह गावातील वाड्या वस्त्यांमध्ये खुलेआम गावठी पन्नी बनावट देशी विदेशी दारुची खुलेआम विक्री उत्पादन शुल्क दारुबंदी पोलिस प्रशासन विभागाच्या हेतूपुरस्सर दुर्लक्षामुळे रावेर तालुक्यातील रावेर. सावदा. निंभोरा पोलिस स्टेशनचे हद्दीत खुलेआमपने विक्री केली जात आहे वर्षभरापूर्वी जळगांव जिल्हा डिपीडीसीच्या बैठकीत अवैध दारुविक्री संदर्भात खुद्द आमदारांनीच अवैध दारू विक्री अवैध धंदेवाईकांची तक्रारींचा पहाडाच वाचला होता आणि पालकमंत्र्यांनी उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारीची कान उघडणी करीत कारवाई करण्याचे आदेश दिले होते व अवैध दारू विक्री कायमचीच बंद करण्यात यावी असे उत्पादन शुल्क दारुबंदी विभागाचे अधिकारी यांना सांगितले होते.म्हणजे याचाच अर्थ पोलिस प्रशासनाला अवैध धंदेवाईक जुमानत नाहीत असा समजावा का ?? या दोन नंबरीवरील पोलिस प्रशासन अधिकारी कर्मचारी यांचा धाक संपलाय का?? जणू चहापान टपरी सारखे विना परवाना अवैध दारू ची विक्री रावेर तालुक्यातील अंकलेश्वर -बुर्हानपुर महामार्गावरील सावदा निंभोरा रावेर पोलिस स्थानकांच्या हद्दीतील गावांमध्ये महामार्गावर विना परवाना होटेल्स ढाबे व गावागावात राजरोसपणे या अवैध देशी विदेशी गावठी पन्नी दारु विक्री ची दुकाने थाटली आहेत आणि खुलेआम विक्री केली जात आहे आणि संबंधित उत्पादन शुल्क विभागाचे व पोलिस प्रशासन व पोलिस कर्मचारी यांना अवैध धंदे . तसेच अवैध दारू विक्री ची ठावठिकाणे माहीत नसावीत का?? असलीच तर कायमची दारुविक्री बंद करीत कार्यवाही का करीत नाही ?अवैध दारू विक्री बंद न करता त्याच जागी विना परवाना अवैध दारुविक्री ची मुभा का दिली जातेय?? ज्या ठिकाणी दारु विक्री होतेय त्याची परवानगी संबंधित अवैध दारू विक्रेत्यांनी. घेतली किंवा नाही ईतकीही तसदी उत्पादन शुल्क दारुबंदी विभागाचे अधिकारी कर्मचाऱी घेत नसावेत का? न घेण्यामागचे कारण काय? की हितसंबंध जोपासत कुठेतरी आर्थिक पाणी मुरतेय का? तसेच जळगांव जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच जिल्हा उत्पादन शुल्क अधिक्षक अज्ञभिन्न आहेत का? संबंधित वरिष्ठ अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रात फेरफटका मारत नाही का?या अवैध धंदे.अवै़ध विना परवाना गावठी पन्नी देशी विदेशी दारुचे अड्डे हॉटेल.ढाबे या वरील खुलेआम विक्री केली जात असलेली दारुविक्री. बद्दल माहिती नसेल काय??
जळगांव जिल्ह्यात अवैध धंदे बंदीसाठी मोहीम राबविण्याचा सुर सुज्ञ नागरिकांतून चर्चेत आहे महामार्गावरील ढाबे हॉटेल्सवर होणारी अवैध बिंनधास्त राजरोसपणे खुलेआम केली जात असलेली अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी रावेर सह तालुक्यातील निंभोरा सावदा पोलिस स्थानकांच्या हद्दीतील सुज्ञ नागरिक करीत आहेत
{ सावदा पोलिस स्टेशनचे हद्दीत अवैध दारू बंदी करण्यासाठी उत्पादन शुल्क दारुबंदी विभागाची ठोस अशी कारवाई अद्यापही नजरेस पडलेली नाही मोठा वाघोदा तालुका रावेर या गावात एकच परवानागीचे दारुचे गोदाम आहे मात्र विनापरवाना दारु विक्री चे सावदा रावेर महामार्गावर व रस्त्याला लागूनच तीन ठिकाणी अवैध दारू विक्री होते.मात्र उत्पादन शुल्क दारुबंदी विभाग व पोलिस प्रशासनाचे नजरेस पडत नसावे का? अशा दुर्लक्षास काय समजायचे?
No comments