शिरपूर शहरात रामविकास पाणपोईचे उद्घाटन जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान महा राज्य च्या माध्यमातून १२ ही महिने आपले संपूर्ण जीवन उघड्यावर उदरनि...
शिरपूर शहरात रामविकास पाणपोईचे उद्घाटन
जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान महा राज्य च्या माध्यमातून १२ ही महिने आपले संपूर्ण जीवन उघड्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या निराधार आणि गरजू बांधवांच्या सेवेसाठी विविध प्रकारचे सेवाभावी कार्य मागील अकरा वर्षा पासून करण्यात येत आहे.
शिरपूर प्रतिनिधी/शामसुंदर सोनवणे चोपडा
(संपादक हेमकांत गायकवाड)
जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान महा राज्य च्या माध्यमातून १२ ही महिने आपले संपूर्ण जीवन उघड्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या निराधार आणि गरजू बांधवांच्या सेवेसाठी विविध प्रकारचे सेवाभावी कार्य मागील अकरा वर्षा पासून करण्यात येत आहे. त्याच प्रकारे प्रतिवर्ष प्रमाणे यंदा ही वाढत्या उष्णते च्या प्रमाणामुळे सर्वच जातील धर्मातील बांधवांच्या सेवेसाठी शिरपूर शहरातील करवंद नाका परिसरात जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान महा राज्य च्या माध्यमातून रामविकास पाणपोई चे शुभारंभ धुळे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते करून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापति के. डी. पाटील यांच्या शुभ हस्ते नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्रीसंत सेनाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून श्रीफळ फोडण्यात आलेहा सेवाभावी उपक्रम मागील आकरा वर्षा पासून जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान महा राज्य च्या माध्यमातून राबविण्यात येत असून त्यात प्रामुख्याने धुळे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील हे मागील आकरा वर्षा पासून त्यांचे पितृजन कैलासवासी जयराम भंदाजी पाटील, राजेंद्र जयराम पाटील, सुरेंद्र जयराम पाटील करवंद यांच्या पुण्यस्मरणार्थ निरंतर संपूर्ण १ महिन्या करिता प्रतिदिवस ५० तर संपूर्ण महिन्या भराकरिता १५०० पाणी चे जार ची सुविधा अखंड अविरत उपलब्ध करून देण्यात येतेतसेच या पाणपोईसाठी एप्रिल व मे महिन्यात उष्णतेचे तापमान मोठ्या प्रमाणावर असते म्हणून छावनी साठी भारत मंडप अँड केटरर्स चे संचालक जिवन चौधरी यांच्या वतीने देखील या पाणपोई साठी मागील अकरा वर्षापासून मंडपाची सुविधा अखंड २ महिने उपलब्ध करून देण्यात येतेया वर्षी देखील देवेंद्र पाटील यांनी पाणी जार ची तर जीवन चौधरी यांनी मंडपाची अखंड सेवेसाठी मोठ्या प्रमाणावर जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान ला मदत केलेली असून प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष विकास सेन, उपाध्यक्ष श्रीरामचंद्र येशी यांच्या वतीने या दानशूर बांधवांचे आभार देखील मानण्यात आलेसदर पाणपोई च्या उद्घाटन प्रसंगी ऑल इंडिया सेन समाज ट्रस्ट नई दिल्ली चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मनोहर खोंडे सर, लौकी गावाचे मा. सरपंच भिमसिग राजपूत, महाराष्ट्र नामिक महामंडाळाचे ज्येष्ठ सल्लागार सि. के महाले सर तसेच कर्मचारी संघटनेचे शहर अध्यक्ष रामचंद्र पवार, नितिन गरुड, दिनेश पाटील, पप्पू जाधव व परिसरातील सर्वच नागरिक या पाणपोई च्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होतेकार्यक्रमाचे आयोजन जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान महा राज्य चे संस्थापक अध्यक्ष विकास सेन उपाध्यक्ष श्रीरामचंद्र येशी यांनी तर सुत्र संचालन मनोहर खोंडे सर यांनी केले.
No comments