क्षेत्रिय अधिकाऱ्याची बैठक संपन्न लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात याचाच एक भाग म्हणून चोपडा तहसील कार्यालयात क्षेत्रीय...
क्षेत्रिय अधिकाऱ्याची बैठक संपन्न
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात
याचाच एक भाग म्हणून चोपडा तहसील कार्यालयात क्षेत्रीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक
चोपडा प्रतिनिधी
(संपादक: हेमकांत गायकवाड)
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून यासाठी प्रशासनाने वेग घेतलेला आहे. याचाच एक भाग म्हणून चोपडा तहसील कार्यालयात क्षेत्रीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली. मतदार संघातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे तथा अति .सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब थोरात, यावल येथील तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, निवडणूक नायब तहसीलदार सचिन बांबळे, नायब तहसीलदार आर आर महाजन, निवडणूक प्रशिक्षक नरेंद्र सोनवणे, सर्व नोडल आणि क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.
मतदार संघातील सर्व मतदान केंद्रांवर देण्यासाठी ईव्हीएम मशीन ची सिलिंग सेटिंग प्रक्रिया प्रशासनाने यशस्वीपणे पार पाडली आहे. निवडणुकीदरम्यान चोपडा तालुक्यातील 136 मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे तर यावल तालुक्यात 24 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले गेले असून त्याद्वारे मतदान केंद्रांचे वेब कास्टिंग करण्यात येणार आहे. सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यानी मतदान केंद्रांची अंतिम तपासणी करून आवश्यक त्या सर्व सुविधा मतदान केंद्रांवर उपलब्ध करून द्याव्यात. मतदान केंद्रांवर कुलर, मंडप, पिण्याचे पाणी व्हिडिओग्राफी आधी आवश्यक बाबी पूर्ण असल्याची खात्री करावी.आदर्श मतदान केंद्र, महिलांसाठी खास पिंक बूथ, मी दिव्यांग मतदान केंद्रांवर सर्व मतदारांना विशेष सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे मानधन रोखीने मिळणार आहे. निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी कसोशीने प्रयत्न करावेत असे आवाहन क्षेत्रीय अधिकारी आणि उपस्थित तलाठ्यांना करण्यात आले.

No comments