adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपड्यात ३१९ मतदान केंद्रांसाठी रविवारी ईव्हीएम चे वाटप

  चोपड्यात ३१९ मतदान केंद्रांसाठी रविवारी ईव्हीएम चे वाटप  १३ मे रोजी होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन मध्ये मतपत्रिका स...

 चोपड्यात ३१९ मतदान केंद्रांसाठी रविवारी ईव्हीएम चे वाटप 



१३ मे रोजी होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन मध्ये मतपत्रिका समाविष्ट करून ती सील करण्याचे काम चोपडा तहसील कार्यालयात मंगळवारी संपन्न 

चोपडा प्रतिनिधी 

(संपादक: हेमकांत गायकवाड)

        १३ मे रोजी होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन मध्ये मतपत्रिका समाविष्ट करून ती सील करण्याचे काम चोपडा तहसील  कार्यालयात मंगळवारी संपन्न झाले. रविवार १२ मे रोजी ही मतदान यंत्रे आणि सर्व आवश्यक ते मतदान साहित्य मतदान केंद्रांवर रवाना होईल. मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन सह कर्मचाऱ्यांना पोहोचवण्यासाठी प्रशासनातर्फे.... ३० बसेस, १० स्कूल बस आणि ६९

खाजगी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. 

                 मतपत्रिकांवर उमेदवारांची अनुक्रमांक, नाव,चिन्ह असलेल्या मतपत्रिका ईव्हीएम मशीन मध्ये समाविष्ट करण्याचे काम प्रशासकीय इमारतीत संपन्न झाल्यानंतर सर्व ईव्हीएम मशीन चोख पोलीस बंदोबस्तात सुरक्षा कोठडीत ठेवण्यात आली. यावेळी उमेदवारांचे प्रतिनिधी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात,निवडणूक नायब तहसीलदार सचिन बांबळे,आर आर महाजन,बीइएल कंपनीचे इंजिनिअर, सर्व सेक्टर अधिकारी, सहाय्यक सेक्टर अधिकारी ,मंडळाधिकारी, नोडल अधिकारी, तलाठी आणि कोतवाल उपस्थित होते. 

                यंत्रे आणि मतदान साहित्याचे वाटप निवडणुकीच्या आदल्या दिवशी रविवारी म. गांधी शिक्षण मंडळ संचलित डॉ सुरेश जी पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणातून निवडणूक कर्मचाऱ्यांना केले जाणार आहे.  यासाठी कंट्रोल युनिट ३१९ व राखीव ६३, बॅलेट युनिट ६३८ व राखीव ७७ आणि व्हीव्हीपॅट ३१९ राखीव ६३ इ.सर्व शासकीय वाहनातून चोख पोलीस बंदोबस्तात सर्व पथके आपापल्या मतदान केंद्रांवर पोहोचतील. 

             सोमवारी निवडणुकीच्या दिवशी उन्हाची तीव्रता लक्षात घेता मतदान केंद्रांजवळ आवश्यक त्या ठिकाणी मंडपाची सोय करण्यात आली आहे. मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, प्रसाधनगृहे,पाळणाघर,बालसंगोपन गृह, दिव्यांगांसाठी व्हील चेअर सारखे सुविधा साहित्य आदी मूलभूत सुविधा पुरवण्यात येणार आहेत.

            मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मतदारसंघातील सर्व नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क जरूर बजवावा असे आवाहन आणि जनजागृती निवडणूक निर्णय प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

No comments