निवडणुकीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी ३१९ पथके मतदान केंद्रांवर रवाना मतदार संघातील ३८ क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ३१९ मतदान क...
निवडणुकीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी ३१९ पथके मतदान केंद्रांवर रवाना
मतदार संघातील ३८ क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ३१९ मतदान केंद्रांवर पथके रवाना झाली. यात तीन सखी मतदान केंद्र, दोन दिव्यांग मतदार केंद्र, एक युवा मतदान केंद्र तर पाच आदर्श मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे.
चोपडा प्रतिनिधी
(संपादक: हेमकांत गायकवाड)
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी चोपडा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली होती. म गांधी शिक्षण मंडळ संचलित डॉ सुरेश जी पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य वॉटरप्रूफ मंडप उभारून क्षेत्रनिहाय कक्ष स्थापन करण्यात आले होते. या पक्षांच्या माध्यमातून सुटसुटीत पद्धतीने मतदान पथकांना मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रशासनाच्या उत्तम नियोजनामुळे कमी वेळात उत्तम पद्धतीने साहित्य वाटपाचे काम संपन्न झाले.
यावेळी मतदार संघातील ३८ क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ३१९ मतदान केंद्रांवर पथके रवाना झाली. यात तीन सखी मतदान केंद्र, दोन दिव्यांग मतदार केंद्र, एक युवा मतदान केंद्र तर पाच आदर्श मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे.
पथकांना मतदान केंद्रांवर पोहोचवण्यासाठी ३०बसेस,१० मिनी बसेस, आणि ६९ खाजगी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे,अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब थोरात, निवडणूक नायब तहसीलदार सचिन बांबळे, नायब तहसीलदार आर आर महाजन, निवडणूक प्रशिक्षक नरेंद्र सोनवणे, सर्व क्षेत्रीय अधिकारी, नोडल अधिकारी,निवडणूक कामी नियुक्त करण्यात आलेले सर्व शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी या उत्तम नियोजनासाठी परिश्रम घेतले.


No comments