अंतुर्ली येथे लोकसभेचे मतदान शांततेत संपन्न चौथ्या टप्प्यात जळगाव व रावेरसह 11 मतदारसंघात मतदान झाले. मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे...
अंतुर्ली येथे लोकसभेचे मतदान शांततेत संपन्न
चौथ्या टप्प्यात जळगाव व रावेरसह 11 मतदारसंघात मतदान झाले. मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे लोकसभेचे मतदान शांततेत पार पडले
किरण पाटील मुक्ताईनगर प्रतिनिधी
(संपादक:हेमकांत गायकवाड)
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज दिनांक 13 मे रोजी मतदान झाले .सकाळी सात ते संध्याकाळी 6 वाजे दरम्यान मतदान झाले या चौथ्या टप्प्यात जळगाव व रावेरसह 11 मतदारसंघात मतदान झाले. मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे लोकसभेचे मतदान शांततेत पार पडले
अंतुर्ली हे गाव रावेर लोकसभा मतदारसंघात येते रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपा व महायुतीचे उमेदवार श्रीमती रक्षाताई खडसे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे श्री श्रीराम पाटील ,बहुजन समाज पार्टीचे विजय काळे व वंचित बहुजन आघाडीचे संजय ब्राह्मणे यांच्यात लढत आहे .या उमेदवाराचे भवितव्य मतपेटीत बंद झालेले आहे या लोकसभेच्या मतदानात कोण जिंकेल याचा निर्णय 4 जूनला होणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे
अंतुर्ली येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत मतदानाची प्रक्रिया पार पडली .यावेळी अंतुर्ली येथील मराठी शाळेत 7 वार्डासाठी 7 मतदान केंद्रे होती. यावेळी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता .रावेर लोकसभा मतदारसंघात 1हजार982 मतदान केंद्रे होती अंतुर्ली येथे मतदान सुरू होण्यापूर्वी सकाळी पावसाने हजेरी लावली नंतर थोड्यावेळाने पाऊस बंद झाला. नंतर 7 वाजता मतदान सुरू झाले .ज्यांना चालता येत नाही अशा वयोवृद्धांसाठी मतदान केंद्रावर नेण्यासाठी अंतुर्ली येथे ऑटो ची व्यवस्था करण्यात आली होती .रावेर लोकसभा मतदारसंघात एकूण 24 उमेदवार रिंगणात आहे या 24 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झालेले आहे .याचा निकाल 4 जूनला लागणार आहे याकडे उमेदवारांसह सर्वांचे लक्ष लागलेले आहे .या निकालाची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे अशाप्रकारे अंतुर्ली येथे मतदान प्रक्रिया पार पडली.अंतुर्ली येथे 8555पैकी 5082 मतदान झाले म्हणजे 59.40% मतदान झाले


No comments