adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपड्यात मतदान उत्साहात व शांततेत संपन्न

  चोपड्यात मतदान उत्साहात व शांततेत संपन्न  चोपडा विधानसभा मतदारघातील ३१९ मतदान केंद्रांवर मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला ६२.३३% टक...

 चोपड्यात मतदान उत्साहात व शांततेत संपन्न 


चोपडा विधानसभा मतदारघातील ३१९ मतदान केंद्रांवर मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला ६२.३३% टक्के मतदान पार पडले. 

चोपडा प्रतिनिधी 

(संपादक: हेमकांत गायकवाड)

लोकसभा सर्वत्रिक निवडणुकीत चोपडा विधानसभा मतदारसंघतर्गत मतदान प्रक्रिया उत्साहात आणि शांततेत संपन्न झाली. चोपडा विधानसभा मतदारघातील ३१९ मतदान केंद्रांवर मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला ६२.३३% टक्के मतदान पार पडले. 


 मतदानासाठी सकाळपासूनच 
मतदारांमध्ये उत्साह दिसून येत होता. अनेक मतदार केंद्रांवर सकाळपासून रांगा लागल्या होत्या. मतदारांच्या सोयीसाठी मतदान केंद्रांवर करण्यात आलेल्या सोयीसुविधांमुळे मतदानाचा उत्साह नागरिकांमध्ये दिसत होता. मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक मतदान केंद्रांना सुशोभित करण्यात आले होते. लोकशाहीचा उत्सव असणाऱ्या या मतदान प्रक्रियेत १६२ मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग करण्यात आली. रात्री पर्यंत गांधी शिक्षण मंडळ संचलित सुरेशजी पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर ईव्हीएम यंत्रे आणि साहित्य स्वीकारण्यात आले. कडक सुरक्षा व्यवस्थेत हे मतदान यंत्रे रात्री जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत.

   


         म
तदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब थोरात, निवडणूक नायब तहसीलदार सचिन बांबळे, नायब तहसीलदार आर आर महाजन,सर्व क्षेत्रीय अधिकारी, नोडल अधिकारी, मतदान केंद्रांवर नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी तसेच पोलीस दलातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



No comments