महाराष्ट्र देशा कनखर देशा महाराष्ट्र म्हटला की डोळ्यासमोर उभे राहातात ते छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे गडकोट किल्ले . यापैकीच जळग...
महाराष्ट्र देशा कनखर देशा
महाराष्ट्र म्हटला की डोळ्यासमोर उभे राहातात ते छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे गडकोट किल्ले.
यापैकीच जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील चौगावचा किल्ला. बहुदुर्लक्षीत पण आजही सुस्थीतीत उभा असलेला दुर्ग प्रकारातील जळगाव जिल्ह्यातला हा एकमेव किल्ला आहे.
विश्राम तेले :चौगाव
(संपादक: हेमकांत गायकवाड)
सध्या महाराष्ट्रात राजा शिवछत्रपती छत्रपती परीवार,छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान,टिम खांदेश एक्सप्लोर ,ऐतिहासिक वारसा संवर्धन कृती समिती अशा अनेक दुर्गसंवर्धन संघटना या किल्यांच्या संवर्धन व स्वच्छतेसाठी कार्यरत आहेत.
त्यातीलच राजा शिवछत्रपती परीवार जळगाव विभागाच्या वतीने या चौगाव किल्ल्यावर पहीली स्वच्छता मोहीम २६ मे २०१९ रोजी संघटनेच्या पहील्या वर्धापण दिनी घेण्यात आली.याच संघटनेच्या जळगाव विभागाने गेल्या पाच वर्षात विविध किल्यांवर एकोणसाठ स्वच्छता मोहीमा राबवल्या असून येत्या २६ मे २०२४ रविवारी संघटनेच्या वर्धापण दिनी ६० वी मोहीम चौगाव किल्ल्यावर यावल वन विभागाच्या सहकार्याने राबवण्यात येणार आहे.
या मोहीमेला जिल्ह्याभरातून स्वखर्चाने मावळे,बालमावळे व रणरागिणी येत असतात.गडकोट स्वच्छते व्यतिरीक्त ही संघटना पावसाळ्यात किल्ला परीसरात वृक्षलागवड व जलसंवर्धनाची कामे देखील करत असते. याचाच एक भाग म्हणून चौगाव गडावरील आई भवानीच्या मुर्तीवर पत्री शेड उभारण्याचे काम परीवाराने हाती घेतले आहे.ते लवकरच पुर्णत्वास येणार आहे.
तरी चौगाव किल्ल्यावरील या वर्धापण दिनाच्या मोहीमेला जास्तीत जास्त संखेने मावळ्यांनी उपस्थीती द्यावे असे अवाहन जळगाव परीवाराच्या वतीने करण्यात आले आहे.





No comments