adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जिविधलम् चे समूह चित्रप्रदर्शन पु.ना.गाडगीळ जळगाव मध्ये

  जिविधलम् चे समूह चित्रप्रदर्शन पु.ना.गाडगीळ जळगाव मध्ये या पाचही चित्रकारांना कलेच्या क्षेत्रात अनेक पुरस्कार मिळाले आहेत प्रतिनिधी चोपडा ...

 जिविधलम् चे समूह चित्रप्रदर्शन पु.ना.गाडगीळ जळगाव मध्ये


या पाचही चित्रकारांना कलेच्या क्षेत्रात अनेक पुरस्कार मिळाले आहेत

प्रतिनिधी चोपडा

(संपादक:हेमकांत गायकवाड)

पु.ना.गाडगीळ अँड सन्स कलादालनात जितेंद्र साळुंके (चोपडा) विरेंद्र सोनवणे (मुंबई) धनराज पाटील (पारोळा) लक्ष्मीकांत सोनवणे (शिंदखेडा) महेंद्र पाटील (मुंबई) या जिविधलम् समूहाच्या चित्र प्रदर्शनाचे  गुरूवारी उद्घाटन प्रसिद्ध काॅडिओलाॅजिस्ट डाॅ.विवेक चौधरी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.त्या वेळेस प्रमुख पाहुणे म्हणून कवी बाळकृष्ण सोनवणे,सौ.वैदेही नाखरे,आकाशवाणी निवेदिका,पु.ना गाडगीळ अँन्ड सन्स चे व्यवस्थापक संदीप पोतदार, महेश घाडगे (संचालक शब्दरंग संवाद), संदीप बाविस्कर,(ग्रीन गोल्ड सिड) त्रिमूर्ती आर्ट फौंडेशन.चे सुशिल चौधरी उपस्थित होते.


जितेंद्र साळुंके यांची सामाजिक आशयातील चित्र वेधक आहेत.पेन इंक माध्यमातील चित्र मांडण्यात आली आहेत.

   विरेंद्र सोनवणे यांनी कॅनव्हास या माध्यमातून पक्षी फुले या घटकांना माणसांच्या जगण्याच्या तर्‍हा  कॅनव्हास वर मांडल्या आहेत 

   निसर्गातील फुल पानं नदी डोंगर यांची सुक्ष्म बारकाव्याची काळया शाईतील असंख्य चित्रे  धनराज पाटील यांची आहेत

 लक्ष्मीकांत सोनवणे यांनी दुःख यातना क्रोध भय व ग्रामीण  भागातील विषय रंग रेषांच्या माध्यमातून मांडले आहे.



  महेद्र पाटील यांनी मुंबईतील विविध भागातील सिटीस्केप अ‍ॅक्रिलीक माध्यमात चित्तरली आहेत. 

या पाचही चित्रकारांना कलेच्या क्षेत्रात अनेक पुरस्कार मिळाले आहेत, तसेच 

पुणे मुंबई सारख्या शहरातील आर्ट गॅलरीत चित्रप्रदर्शने भरवली आहेत.

  डाॅ.विवेक चौधरी तसेच सौ.वैदवी नाखरे मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले.

 या वेळी चित्रकार सुभाष सोनवणे. राहुल सुर्यवशी इ. उपस्थित होते. सूत्रसंचालन लक्ष्मीकांत सोनवणे यांनी केले.हे प्रदर्शन दि १६ मे ते३१ मे पर्यंत सर्वान साठी विनामूल्य सुरू आहे तरी कला रसिकांनी वेगवेगळ्या शैलीतील कलाकृतीना भेट द्या असे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

No comments