adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

विविध शासकिय योजनांच्या फाईल मोफत तयार करुन देण्याच्या प्रहारच्या उपक्रमाचे

  विविध शासकिय योजनांच्या फाईल मोफत तयार करुन देण्याच्या प्रहारच्या उपक्रमाचे आ. बच्चु कडु यांच्या हस्ते विमोचन अमोल बावस्कार: मलकापूर प्रति...

 विविध शासकिय योजनांच्या फाईल मोफत तयार करुन देण्याच्या प्रहारच्या उपक्रमाचे

आ. बच्चु कडु यांच्या हस्ते विमोचन

अमोल बावस्कार: मलकापूर प्रतिनिधी

(संपादक: हेमकांत गायकवाड)

मलकापूर: जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळावा याकरीता प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आ. बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनात नेहमीच कार्य केले जाते. त्याच अनुषंगाने मलकापूर प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना यासह आदी योजनांचा गरजुंना लाभ मिळावा यासाठी मोफत फाईल तयार करून त्यांना उपलब्ध करून देण्याचे कार्य मलकापूर तालुक्यात करण्यात येत आहे. त्या फाईलचे विमोचन प्रहारचे संस्थापक अध्यक्ष आ. बच्चुभाऊ कडू यांच्याहस्ते अचलपूर तालुक्यातील कुरडपुणर्णा येथे त्यांच्या निवासस्थानी करण्यात आले. शासनाच्या माध्यमातून अनेक योजना राबविल्या जातात. परंतु त्या योजनांच्या कागदपत्रांची पुर्तता करतांना अनेक अडचणी निर्माण होतात. अशावेळी अनेक जण या योजनांच्या लाभापासून वंचितही राहतात. तेव्हा अशा पात्र नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा याकरीता प्रहार जनशक्ती पक्षाच्या मलकापूर येथील पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना यासह आदी योजनांकरीता लागणाऱ्या कागदपत्रांची एकत्रित एक फाईल तयार करून ती गरजूंना मोफत उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्या फाईलचे नुकतेच विमोचन प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आ. बच्चुभाऊ कडू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हा उपप्रमुख अजय टप, सौ उषाताई मानकर तालुकाप्रमुख अजित फुंदे तालुका उपप्रमुख अमोल अहिर यासह आदी उपस्थित होते.

No comments