चोपड्यातिल एका बॅंकेत आढळल्या पाचशे रुपयांच्या बनावट नोटा सी.एम.एस.चे नियुक्त लोक रिसायकलर मशीन उघडल्यावर त्यावेळी नक्की काय झाले आहे. ते प...
चोपड्यातिल एका बॅंकेत आढळल्या पाचशे रुपयांच्या बनावट नोटा
सी.एम.एस.चे नियुक्त लोक रिसायकलर मशीन उघडल्यावर त्यावेळी नक्की काय झाले आहे. ते पाहुन तुम्हाला सांगता येईल.
मशीन मध्ये असलेल्या बनावट नोटांच्या बकेटमध्ये ५०० रु च्या ५ नोटा (एकुन रक्कम २५०० रु) बनावट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
प्रतिनिधी: चोपडा
(संपादक: हेमकांत गायकवाड)
याबाबत अधिक माहिती अशी की गोकुळ सुखदेव सोनवणे रा. विदयाविहार कॉलनी चोपडा जि. जळगाव हे दिनांक १७/०५/२०२४ रोजी १२.०० ते दि.१८/०५/२०२४ रोजीचे दुपारी १४.३० वाजेचे दरम्यान स्वताः चे ॲक्सिस बँकेच्या खात्यावर रिसायक्लर मशीन व्दारे ५०० रु दराचे एकुण ४० नोटा अशी एकूण रक्कम २०,०००/-रुपये यांनी डिपोझिट (भरणा) केल्या त्यापैकी १७,५००/- रु इतकी रक्कम यांचे बँक खात्यात जमा झाल्याचा मेसेज त्याना प्राप्त झाला होता तर उर्वरीत २५००/- रु रक्कम खात्यात जमा का झाली नाही याबाबत याने हर्षल जयविलास जैन वय ४२ वर्ष धंदा नोकरी रा. गुजराथी गल्ली धरणगाव अर्बन बँकच्या बाजुला चोपडा ता. चोपडा जि. जळगाव यांचेकडे चौकशी करुन सी.एम.एस.चे नियुक्त लोक रिसायकलर मशीन उघडल्यावर त्यावेळी नक्की काय झाले आहे. ते पाहुन तुम्हाला सांगता येईल. असे सांगितले होते
त्यानंतर दुसऱ्या दिवशी दि. १८/०५/२०२४ रोजी दुपारी १४.३० वाजेच्या सुमारास सीएमएस या कंपनीचे कर्मचारी १) ललीत पाटील २) मच्छिद्र कोळी हे बँकेत आले. त्यांनी रिसायक्लर मशीन मध्ये जमा झालेली रक्कम काढण्यासाठी उघडुन पाहीले असता त्या मशीन मध्ये असलेल्या बनावट नोटांच्या बकेटमध्ये ५०० रु च्या ५ नोटा (एकुण रक्कम २५०० रु) बनावट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
तेव्हा काउंटर स्लिप मध्ये नमुद अकाउंट क्र. तपासणी करण्यात आला यावेळी हा आरोपींचा असल्याची खात्री झाल्याने सदर आरोपी याने त्याचे कब्जातील भारतीय चलनातील ५००/- रु दराचे ४० नोटा असे एकुण २००००/- पैकी ५००/- रु.दराच्या ५ (पाच) असे एकुण २५००/- रु किमतीचे बनावट नोटा २,५००/-रु.किमतीच्या भारतीय चलनातील ५००/- रुपये दराच्या ५ बनावट नोटा त्यांचे ९EL४६४२६७,१KE९७१९६६,१KE९७१९६४, १KE९७१९६७,७PF ८१७१६६ असे सिरीयल नंबर असलेल्या. आरोपी यास माहित असुनही त्याने जाणीवपुर्वक त्या बनावट/नकली चलनी नोटा खऱ्या असल्याचे भासवुन बॅंक खात्यात जमा करुन चलनात आणल्या म्हणुन अंमलदार पोहेकॉ/ शुभांगी लांडगे नेम चोपडा शहर पोस्टे CCTNS भाग ५ गुरनं. १९५/२०२४ भादवि कलम ४८९ (व), ४८९ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अति. प्रभार पोनि कावेरी कमलाकर नेमणुक चोपडा ग्रामिण पो.स्टे. यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि एकनाथ भिसे नेम. चोपडा शहर पोस्टे हे अधिक तपास करत आहेत
No comments