संत सेनाजी महाराज जीवन चरित्र व अभंग गाथा ग्रंथ प्रकाशन सोहळा संपन्न भाऊसो. रामचंद्र रतिलाल येशी समाजभूषण पुरस्काराने सन्मानित शिरपूर (प...
संत सेनाजी महाराज जीवन चरित्र व अभंग गाथा ग्रंथ प्रकाशन सोहळा संपन्न
भाऊसो. रामचंद्र रतिलाल येशी समाजभूषण पुरस्काराने सन्मानित
शिरपूर (प्रतिनिधी)
(संपादक:हेमकांत गायकवाड)
संत सेनाजी महाराज जीवन चरित्र व अभंग गाथा ग्रंथ प्रकाशन सोहळा ऑल इंडिया सेनजी महासंघ ट्रस्टचे संस्थापक मा. एम. एस. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली धुळे शहरातील गरुड वाचनालय हॉलमध्ये दुपारी २:०० वाजता अत्यंत उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मा. हिरालाल गुमान ठाकरे, मा. दिलीप चैत्राम येशी, मा. अनिल मधुकर बोरुडे, प्रा.डॉ. ज्ञानेश्वर बापू वाघ, मा. अँड. किशोर बाबुराव जाधव मा. युवराज नारायण वारूडे या मान्यवरांसह लेखक भगवान चित्ते उपस्थित होते. सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तथागत गौतम बुद्ध, विनयपती उपाली, संतश्रेष्ठ सेनाजी महाराज, शिवरक्षक जिवाजी महाले, शहीद भाई कोतवाल या महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.
लेखक भगवान चित्ते यांनी प्रास्ताविक केल्यानंतर संत सेनाजी महाराज जीवन चरित्र व अभंग गाथा ग्रंथाचे प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शिरपूर शहरातील समाज पदाधिकारी भाऊसो. रामचंद्र रतिलाल येशी (जिल्हाध्यक्ष, ऑल इंडिया सेनजी महासंघ, धुळे) (उपाध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, धुळे) यांच्या अनेक वर्षांच्या समाजकार्याची दखल घेवून लेखक भगवान चित्ते यांनी नाभिक मंच परिवारातर्फे त्यांना समाजभूषण या पुरस्काराने सन्मानित केले. सदर पुरस्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथींच्या हस्ते त्यांना देण्यात आला. याप्रसंगी शिरपूर शहरातील रामचंद्र नारायण पवार
जनकल्यान सेवाभावी प्रतिस्टांनचे संस्थापक अध्यक्ष विकास सेन गोपाल वरसाडे सर रविंद्र सोनगिरे सर संजयजी वरसाडे
महिला जिल्हा अध्यक्षा सौ हेमलता रामचंद्र येशी
तसेच धुळे येथील महाराष्ट्र नाभिक महामंडाळाचे सचिव बि .के सुर्यवंशी
प्रसिद्धी प्रमुख विशाल चित्ते मोगलाई परिसराचे अध्यक्ष प्रविन सैंदाणे लक्ष्मण बोरसे
जिवाजी सेनेचे प्रदेश अध्यक्ष दिनेशभाऊ महाले . धुळे जिल्हा दुकानदार संघटनेचे अध्यक्ष रविंद्र सैंदाणे सर नरेंद्र दादा खोडे विजय सैंदाणे तसेच जिल्हातील बहुसंख्य समाज बांधव महिला भगीनी कार्यक्रमाला
उपस्थित होते. भाऊसो. रामचंद्र रतिलाल येशी यांना नाभिक मंच परिवारातर्फे समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे शिरपूर तालुका, शहर समाज बांधवांसह खान्देश व महाराष्ट्रातील समाजबांधवांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
No comments