adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शेतकरी ते ग्राहक भुईमुग शेंगा विक्रीला उत्तम प्रतिसाद

  चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत भुईमूग ची आवक वाढली ;   सरळ शेतकऱ्यांकडून घेण्यास लोकांची गर्दी  शेतकरी ते ग्राहक भुईमुग शेंगा विक्रीला उत...

 चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत भुईमूग ची आवक वाढली ; 


सरळ शेतकऱ्यांकडून घेण्यास लोकांची गर्दी 

शेतकरी ते ग्राहक भुईमुग शेंगा विक्रीला उत्तम प्रतिसाद 

चोपडा (प्रतिनिधी)---

(संपादक:हेमकांत गायकवाड)

 गरीबांचे काजु म्हणजेच शेंगदाणे चोपडा बाजार समितीत शेतकरी ते ग्राहक भुईमुग शेंगा विक्रीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.७५ रुपये किलो प्रमाणे ग्राहक मोठ्या प्रमाणात भुईमूग घेऊन जाताना दिसत आहे 


चोपडा तालुक्यात एके काळी हजारो एकरवर भुईमूगाचा पेरा होत असायचा मात्र आता वाढत्या तापमानाच्या मानाने होणारा उन्हाळी भुईमुगाचा पेरा पाण्याची उपलब्धता , विजेचा लपंडाव यामुळे ही आणि वाढती मजुरी यामुळे भुईमुगाचा पेरा अत्य अल्प झाला आहे त्यामुळे ठराविक कालावधीतच भुईमूग शेंगा विक्री साठी येत असतात .चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत भाव जरी मिळाला तरी शेतकऱ्यांनी सरळ ग्राहकांना माल जर दिला तर ४००ते ५०० प्रति क्विंटल जास्तीचा भाव  मिळून जातो त्यामुळे शेतकरी सरळ ग्राहकाला माल देण्यासाठी जास्त इच्छुक असतात ग्राहकांना सुध्दा  व्यापारी कडून भुईमूग घेण्यापेशा अश्या शेतकऱ्यांना कडून घेतले तर स्वस्त पडतात त्यामुळे ग्राहक व शेतकरी दोघ ही खुश दिसत असतात शेंगदाणे हे  गृहिणींनसाठी रोजच्या जीवनात अवीभाज्य घटक होऊन गेला आहे. शेंगदाणे पासून चटणी, भरपूर भाज्या मध्ये शेंगदाण्याचे खुट वापरले जाते उपवासाला भाजलेल्या शेगां, खाऱ्या शेंगा किंवा शेगदाणे गुळ चांगला व स्वस्त फराळ असतो , अजुनही काही लोक शेगां फोडून शेंगदाणे पासुन घान्यावर तेल काढून घेतात हे  तेल जरी महाग पडत असेल तरी त्याची शुद्धता व गुणधर्म मात्र बाजारातल्या शेंगदाणा तेला पेक्षा कित्येक पटीने जास्त चांगले असते . त्यामुळे अजूनही भरपूर लोक भुईमूगाच्या शेंगा पासून तेल काढले जाते. त्यामुळे कमी खावे पण चांगले खावे  असे म्हणतात काही वर्ग घाण्याचे तेल काढणेच पसंत करतात.



No comments