adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा येथे मुख्य निवडणूक निरीक्षक मीना यांनी घेतला निवडणूक कामाचा आढावा ....

चोपडा येथे मुख्य निवडणूक निरीक्षक मीना यांनी घेतला निवडणूक कामाचा आढावा .... लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आ...

चोपडा येथे मुख्य निवडणूक निरीक्षक मीना यांनी घेतला निवडणूक कामाचा आढावा ....



लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. अशातच रावेर लोकसभा मतदार संघातील चोपडा विधानसभा मतदारसंघात मुख्य निवडणूक निरीक्षक अशोककुमार मीना यांनी चोपडा तहसील कार्यालय येथे भेट दिली.

प्रतिनिधी चोपडा

(संपादक : हेमकांत गायकवाड)

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. अशातच रावेर लोकसभा मतदार संघातील चोपडा विधानसभा मतदारसंघात मुख्य निवडणूक निरीक्षक अशोककुमार मीना यांनी चोपडा तहसील कार्यालय येथे भेट दिली. लोकसभा निवडणूकाच्या कामकाजाची केलेल्या तयारी बाबत माहिती घेतली यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब थोरात, निवडणूक नायब तहसीलदार सचिन बांबळे, नायब तहसीलदार आर आर महाजन, सर्व नोडल अधिकारी, व सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पाहणी दरम्यान त्यांनी स्ट्रॉगरूमला भेट दिली. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे, अग्निशमन यंत्रणा, मतदार यादी परीक्षण प्रक्रिया व इतर सुरक्षेबाबत पाहणी केली. प्रशासनामार्फत निवडणूक कामी सर्व कामकाजा बाबत तयार केलेल्या कंट्रोल रुमची पाहणी केली. एक खिडकी कक्ष, मिडीया कक्ष, सीव्हिजिल कक्ष यांची पाहणी करुन कामकाजाची माहिती घेतली. तसेच आवश्यक सुचना दिल्या. निवडणुकीच्या कामात सर्व व्यवस्था चोख ठेवण्यात यावी. तसेच क्षेत्रीय अधिकारी यांनी निःपक्षपातीपणे तपासणी करण्यात यावी. टपाली मतदार कक्षात भेट देवून गृह मतदान बाबतीत सुचना दिल्या. तसेच निवडणुक कामी नियुक्त सर्व सेक्टर अधिकारी यांचा आढावा घेण्यात आला. मतदानाच्या दिवशी काय करावे, काय करू नये याबाबत मार्गदर्शन केले. निवडणूक कामात नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांनी कोणाच्याही घरी जावू नये अशी सक्त ताकीद दिली. केंद्रस्तरीय अधिकारी यांना सखोल व सविस्तर सुचना दिल्या व मार्गदर्शन केले. पाहणीनंतर कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.

No comments