adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

उत्तर महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यात शिरपूर येथे प्रथमत:च नाभिक समाजाचे विद्यार्थी व विद्यार्थ्यीनींसाठी स्पर्धा परीक्षेचे सेमिनार शानदार संपन्न

  उत्तर महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यात शिरपूर येथे प्रथमत:च नाभिक समाजाचे विद्यार्थी व विद्यार्थ्यीनींसाठी स्पर्धा परीक्षेचे सेमिनार शानदार संप...

 उत्तर महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यात शिरपूर येथे प्रथमत:च नाभिक समाजाचे विद्यार्थी व विद्यार्थ्यीनींसाठी स्पर्धा परीक्षेचे सेमिनार शानदार संपन्न


शिरपूर प्रतिनिधी /चोपडा प्रतिनिधी

(संपादक: हेमकांत गायकवाड)

शिरपूर येथे ऑल इंडिया सेन समाज शाखा धुळे, महाराष्ट्र नाभिक कर्मचारी महामंडळ जिल्हा धुळे, जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थांकडून नाभिक समाजातील विद्यार्थ्यांसाठी 

         ओळख स्पर्धा  परीक्षेची 

या सेमिनार आयोजन करण्यात आले होते. या सेमिनारचे औपचारिक उद्घाटन शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राज गोपाल भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ.तुषार रंधे, धुळे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, प्र. महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी वैशाली निकम, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे सीईओ डॉ.उमेश शर्मा, ऑल इंडिया सेन समाज महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मनोहर खोंडे, रावसाहेब भालचंद्र वाघ,प्राचार्य आर.एन. पवार, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष भीमराव वारुळे, ऑल इंडिया सेन समाज जिल्हाध्यक्ष रामचंद्र येशी, सचिव बी के सूर्यवंशी, महाराष्ट्र नाभिक महिला महामंडळाच्या जिल्हाध्यक्ष हेमलता येशी, महाराष्ट्र नाभिक महिला कर्मचारी महामंडळाच्या जिल्हाध्यक्ष रंजनाताई सूर्यवंशी, महाराष्ट्र नाभिक कर्मचारी महामंडळ जिल्हाध्यक्ष दिलीप येशी नाभिक हीत वर्धक संस्थेचे जिल्हाध्यक्ष जगदीश सोनगडे जनकल्याण सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विकास सेन नाभिक मंचचे संपादक भगवान चित्ते उपस्थित होते.नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी सेनाजी महाराज व वीर जिवाजी महाले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली. त्यानंतर कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष रवींद्र खोंडे यांनी ओळख स्पर्धा परीक्षेची हा सेमिनार घेण्यामागचा हेतू उपस्थित विद्यार्थी व समाज बांधव यांना आपल्या प्रास्ताविकतून समजावून सांगितलां. उपस्थित मान्यवर व तज्ञ मार्गदर्शकांचा संघटनेचे पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सेमिनारसाठी उपस्थित प्रमुख अतिथी शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांनी विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले तसेच हा सुंदर उपक्रम समाजापुरता मर्यादित न ठेवता सर्वच समाजातील विद्यार्थ्यांसाठी खुला ठेवावा आम्ही सर्व प्रकारची मदत करण्यासाठी तयार आहोत असा शब्द दिला तसेच किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष माजी धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ तुषार रंधे यांनी स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या सर्व पुस्तकांचे व्यवस्था करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच विद्यार्थ्यांच्या पुस्तकांसाठी ज्ञानेश्वर बोरगावकर यांनी सुद्धा 2100 रुपयांची रोख मदत केली.या सेमिनारसाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून जगातील 40 देशांचा दौरा करून आलेले ऑक्सफर्ड सारख्या युनिव्हर्सिटी त मार्गदर्शन करणारे जळगाव येथील पांडे अकॅडमी चे संचालक सुरेश पांडे सर, गणित तज्ञ प्रा. खेमचंद्र पाटील सर, विज्ञान तज्ञ प्रा. सचिन पाटील सर तज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. या सेमिनार साठी तालुक्यातील 150 विद्यार्थी व बरेच पालक उपस्थित होते. अतिशय हसत खेळत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उंचावेल असे मार्गदर्शन उपस्थित तज्ञ मार्गदर्शक यांनी विद्यार्थ्यांना केले. या सेमिनारच्या नियोजनासाठी शिरपूर तालुक्यातील साहित्य क्षेत्रातील नामवंत कवी व लेखक यशवंत निकवाडे सर यांची महत्त्वपूर्ण मदत झाली. या सेमिनार साठी रावसाहेब भालचंद्र वाघ, रामचंद्र येशी, दिलीप येशी, विकास सेन जितेंद्र सनेर, सुभाष बोरसे, रंजनाताई सूर्यवंशी, रवींद्र खोंडे यांनी आर्थिक मदत केली.या सेमिनारसाठी नाभिक समाजातील विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन करून घेणे ही महत्त्वपूर्ण भूमिका कर्मचारी संघटनेचे तालुका सचिव गोपाल वरसाळे सर,कर्मचारी संघटना शहर अध्यक्ष रामचंद्र पवार यांनी बजावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र खोंडे सर यांनी केले तर उपस्थितांचे आभार कर्मचारी संघटना खजिनदार रवींद्र सोनगिरे सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुका अध्यक्ष नंदू बोरसे सर, गोपाल सैंदाणे सर, प्रताप सोनवणे सर,संजय वरसाळे, भगवान निंबाळकर यांनी परिश्रम घेतले.

No comments