जिल्हाधिकाऱ्यांनी दिली जिल्ह्यातील पहिल्या मतदान केंद्राला भेट जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाने सुरू होणारे १ मोरचिडा या मतदान केंद्रास जिल्हाध...
जिल्हाधिकाऱ्यांनी दिली जिल्ह्यातील पहिल्या मतदान केंद्राला भेट
जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाने सुरू होणारे १ मोरचिडा या मतदान केंद्रास जिल्हाधिकारी यांनी भेट देऊन मतदान केंद्रातील किमान मूलभूत सुविधांचा आढावा घेतला तसेच मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्याचे आवाहन केले,
चोपडा प्रतिनिधी
(संपादक: हेमकांत गायकवाड)
रावेर मतदार संघातील चोपडा मतदारसंघ हा १० अनूक्रमांकाचा असुन जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाने सुरू होणारे १ मोरचिडा या मतदान केंद्रास जिल्हाधिकारी यांनी भेट देऊन मतदान केंद्रातील किमान मूलभूत सुविधांचा आढावा घेतला तसेच मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्याचे आवाहन केले,
तसेच जिल्हा व राज्य सीमेवरील सत्रासेन व उमर्टी या स्थिर सर्वेक्षण पथकास भेट देऊन आढावा घेतला आणि आवश्यक त्या सुचना दिल्या.
तसेच उमर्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आढावा घेतला.
आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या मतदान यंत्र तयार करणे या कामकाजाचा आढावा घेण्यास आले असताना त्यांनी स्ट्रॉंग रूम,कंट्रोल रूम व सिम्बॉल लोडिंग कामाची पाहणी केली व आवश्यक त्या सूचना दिल्या.





No comments