adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

श्रीराम करतील खडसे यांची रक्षा

        श्रीराम करतील खडसे यांची रक्षा सन 1952 पासून आतापर्यंत रावेर लोकसभेत आठ जणांनी प्रतिनिधित्व केलेले आहे त्यामध्ये एस आर राणे वायएस मह...

        श्रीराम करतील खडसे यांची रक्षा

सन 1952 पासून आतापर्यंत रावेर लोकसभेत आठ जणांनी प्रतिनिधित्व केलेले आहे त्यामध्ये एस आर राणे वायएस महाजन वाय एम बोरोले डॉक्टर गुणवंतराव सरोदे डॉक्टर उल्हासराव पाटील वायजी महाजन हरिभाऊ जावळे व रक्षा खडसे इत्यादी सर्व म्हणजे एकाच लेवा पाटीदार समाजाचे आहेत अन्य जातीचा उमेदवारास येथे विजय प्राप्त करता आलेला नाही

सुरुवातीला बुलढाणा लोकसभा नंतर भुसावळ लोकसभा नंतर जळगाव लोकसभा व नंतर रावेर लोकसभा अशी या लोकसभेची पुनर्रचना झालेली आहे कधी काळी एरंडोल लोकसभे अंतर्गत असलेला चोपडा तालुका व जळगाव लोकसभा अंतर्गत असलेला जामनेर तालुका यांच्या देखील समावेश या लोकसभे अंतर्गत झालेला आहे हे दोन तालुके जोडले गेल्यामुळे लेवा पाटीदार समाजाचे वर्चस्व कमी झाले आहे असे असले तरी येथे काही फरक पडलेला नाही कधीकाळी काँग्रेसच्या बालेकिल्ला असलेला हा लोकसभा मतदारसंघ डॉक्टर गुणवंतराव सरोदे पासून भारतीय जनता पक्षाकडे झुकलेला आहे मध्यंतरी डॉक्टर उल्हासराव पाटील यांच्या रूपाने काँग्रेसने मुसंडी मारली तर नंतर येथे पुन्हा भारतीय जनता पक्षाने आपला झेंडा रोवलेला आहे तत्कालीन विद्यमान खासदार हरिभाऊ जावळे यांचे तिकीट कापून एकनाथराव खडसे यांनी आपली सून रक्षा खडसे यांना पुढे केले सन 2014 ला झालेल्या निवडणुकीत संपूर्ण देशात असलेल्या मोदी लाटेत रक्षा खडसे यांच्या दणदणीत विजय झाला व सन 2019 मध्ये त्या पुन्हा मोदी लाटेत दणदणीत विजय संपादन करून पुनश्च खासदार झाल्या व सन 2024 च्या निवडणूक रिंगणात त्या पुन्हा उतरल्या असून हॅट्रिक च्या प्रतीक्षेत आहेत यावेळी त्यांच्या सामना राजकीय कमकुवत तुतारी वाजविणाऱ्या श्रीराम पाटील यांच्याशी आहे त्यांचे राजकीय वय फक्त एक दोन दिवस आहे त्यांनी पक्षप्रवेश घेतला आणि दुसऱ्या दिवशी त्यांना पक्षाने लोकसभेचे तिकीट दिले असा राजकीय प्रवास त्यांच्या आहे उद्योजक म्हणून त्यांच्या मोठा गाजावाजा असला तरी जनतेला त्याच्याशी काही घेणे देणे नाही व जनतेशी त्यांना काही घेणे देणे नाही कारण अशा उद्योजकांना जवळ घेणे शरद पवारांची जुनी किमया आहे महाराष्ट्रात पुलोद सरकार सत्तेत असताना त्यांनी एस काँग्रेस स्थापन करून चरखा या चिन्हाच्या निशाणीवर जळगाव मधून सुरेश दादा जैन जामनेर मधून ईश्वरलाल बाबूजी जैन चोपड्यातून अरुण भाई गुजराती शिरपूर मधून अमरीश भाई पटेल गोंदिया चे प्रफुल्ल भाई पटेल यांच्यासारख्या केवळ श्रीमंतांनाच जवळ केले होते 18 पगड जातीच्या विकास मराठा आरक्षण या विषयांच्या पवार साहेबांशी चुकूनही संबंध येत नाही या उलट पक्षातील जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते श्री रविंद्र भैया पाटील श्री संतोष चौधरी माजी आमदार भुसावळ यासारख्या मातब्बर इच्छुक उमेदवारी करणाऱ्या नेत्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे रावेर लोकसभा अंतर्गत आज मी तिला एकही विधानसभा सदस्य राष्ट्रवादी चंद्र पवार गटाच्या नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद या लोकसभा क्षेत्रात नगण्य आहे आणि आता राष्ट्रवादी पक्ष विभागला गेला असून जी थोडीफार ताकद आहे ती घड्याळाकडे झुकलेली आहे उबाठा तर येथे असून नसल्यासारखा आहे राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढविणारे एकनाथराव खडसे भारतीय जनता पक्षाच्या लक्ष्मण रेषेवर थांबलेले आहेत 4 जून नंतर कदाचित पवार साहेबांच्या मांडीला मांडी लावून ते रावेर मध्ये तुतारी का वाजली नाही याचे चिंतन करत बसतील दोन बागडे ने एक दिवा खासदारांनी दिला अशी बोचरी टीका करणारे माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराती यांनी 26 वर्ष सत्तेत सर्वोच्च पदावर राहून कुठे व कोणते दिवे लावले हे सर्व चोपडा तालुका वासीय जाणतात तसेच बऱ्याच दिवसापासून उपवास करणारे चालक-मालक संघटनेला श्रीराम पावला असून त्यांच्या उपवासाची सांगता चांगल्या प्रकारे झाली मी नुकताच जामनेर येथे गेलो असता तेथे प्रत्येक घराच्या भिंतीवर घर श्रीराम असे ब्रीद रंगवले आहे तो हाच श्रीराम की अयोध्येचा राजा प्रभू श्रीराम याचे उत्तर देखील जामनेरच्या संकटमोचकाला द्यावे लागणार आहे कानातील कुजबुज असो वा कट्ट्यावरच्या गप्पा वा चौकातील सभा कोणी काहीही बोलेल परंतु 4 जून 2024 ला रावेर लोकसभेची मतगणना असलेली पेटी बोलेल                   
आमची रक्षा रावेरची रक्षा 

पत्रकार जयराम कोळी वडती तालुका चोपडा ९९६० १२ ४९ ०४

No comments