adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा - यावल रस्त्यावर अपघातात दोघ जणांचा मृत्यू

  चोपडा - यावल रस्त्यावर अपघातात दोघ जणांचा मृत्यू चोपडा - यावल रस्त्यावरील काबरा पेट्रोलपंपाच्या जवळपास यावलकडून येणाऱ्या कारने चोपडा येथून...

 चोपडा - यावल रस्त्यावर अपघातात दोघ जणांचा मृत्यू

चोपडा - यावल रस्त्यावरील काबरा पेट्रोलपंपाच्या जवळपास यावलकडून येणाऱ्या कारने चोपडा येथून अडावदकडे जाणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने अपघात 


चोपडा : प्रतिनिधी

(संपादक: हेमकांत गायकवाड)

चोपडा - यावल रस्त्यावरील काबरा पेट्रोलपंपाच्या जवळपास यावलकडून येणाऱ्या कारने चोपडा येथून अडावदकडे जाणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाला असून यात 

 दोघ जणांना मृत्यू झाला. रतन ऊर्फ नितीन रमेश पाटील (३८) व चेतन निंबा पाटील (२५, दोन्ही रा. पारगाव) अशी मयत तरुणांची नावे आहेत.

मंगळवारी सायंकाळी ४:३० वाजेच्या सुमारास चोपडा-यावल रस्त्यावर भरधाव कारने (एमएच ०४ जेएम ३३८८) दुचाकीवरील (एमएच १९ एएम ५४८१) दोघांना धडक दिली. अपघातात पारगाव येथील रतन पाटील व चेतन पाटील हे दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. दोघांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांना अधिक उपचारासाठी जळगावला पाठवण्यात आले होते जळगाव येथे खासगी रुग्णालयात दाखल केले असता दोघांनाही मृत घोषित करण्यात आले या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे 



No comments